‘मुसलमान जगावर राज्य करण्यासाठी, गुलामीसाठी नाही’; VIDEO

पाकिस्तानी खेळाडूचे वादग्रस्त विधान

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
इस्लामाबाद,  
mohammad-rizwan-controversial-statement पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्याने “आम्ही एका ध्येयासाठी आलो आहोत, आधी धर्म, नंतर व्यवसाय. मुसलमानांना नेतृत्वासाठी पाठवले गेले आहे, गुलामीसाठी नाही,” असे विधान केले. त्याच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
mohammad-rizwan-controversial-statement
 
काहींनी रिझवानच्या भाषणाला वैयक्तिक श्रद्धेची अभिव्यक्ती आणि प्रेरणादायी संदेश असे स्वरूप दिले आहे, तर अनेकांनी ते वादग्रस्त आणि विभाजनाला खतपाणी घालणारे असल्याचे मत व्यक्त केले. विशेषतः “आधी धर्म, नंतर प्रोफेशन” या विधानामुळे क्रीडा क्षेत्रात व्यावसायिकता आणि वैयक्तिक श्रद्धा यांची सीमारेषा काय असावी, यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. रिझवान यापूर्वीही आपल्या धार्मिक श्रद्धांबाबत उघडपणे बोलताना दिसला आहे. मात्र या नव्या वक्तव्याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. mohammad-rizwan-controversial-statement दरम्यान, रिझवानला पाकिस्तानच्या टी-२० वर्ल्ड कप संघात स्थान मिळालेले नाही. अलीकडील टी-२० सामन्यांतील त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आल्याने निवड समितीने त्याला वगळल्याची चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये त्याने १०६ सामन्यांत ४७.४१ च्या सरासरीने ३४१४ धावा केल्या असून त्यात एक शतक आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे.
सौजन्य : सोशल मीडिया 
स्पर्धेच्या दृष्टीने पाकिस्तान संघाची परिस्थितीही सध्या तणावपूर्ण आहे. अमेरिका आणि नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळविल्यानंतरही भारताकडून झालेल्या पराभवामुळे त्यांची समीकरणे बिघडली. mohammad-rizwan-controversial-statement अमेरिकेने अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवत नेट रन रेटच्या आधारे पाकिस्तानला मागे टाकले. त्यामुळे सुपर ८ मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी नामिबियाविरुद्धचा सामना जिंकणे पाकिस्तानसाठी अत्यावश्यक ठरला.