- नागपूर विभागात प्रथम, ५० लाखांचा मानाचा पुरस्कार
दिनांक :19-Feb-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव,
environmental conservation पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणार्या सिरेगावबांध ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये नागपूर विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. १५०० ते २००० लोकसंख्या गटात अव्वल ठरत ग्रामपंचायतीने ५० लाख रुपयांच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. दरम्यान, २१ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
१ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राज्यातील ४२२ नागरी स्थानिक संस्था व २७ हजार ८९५ ग्रामपंचायती अशा एकूण २८ हजार ३१७ स्थानिक संस्थांनी या अभियानात सहभाग घेतला होता. कडव्या स्पर्धेत सिरेगावबांध ग्रामपंचायतीने विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून तालुक्याचा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत गंगेझरी पर्यटन व तीर्थस्थळ परिसरात ५०१ विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.environmental conservation गाव परिसर हिरवागार व स्वच्छ ठेवणे, पर्यावरण संरक्षण, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रभावी पावले उचलणे, तसेच शाश्वत विकासाची दिशा निश्चित करणे या बाबींमुळे ग्रामपंचायतीची कामगिरी ठळक ठरली. यापूर्वीही सिरेगावबांध ग्रामपंचायतीला ‘स्मार्ट ग्राम’सह विविध तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.