दाेन पिस्तूल व 34 जिवंत काडतुसांसह चाैघे अटकेत

- गुन्हे शाखेच्या घराेडीविराेधी पथकाची कामगिरी

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
crime squad दाेन पिस्तूल आणि 34 जिवंत काडतुसांसह चार आराेपींना गजाआड करून गुन्हे शाखेच्या घराेडी विराेधी पथकाने 1 लाख 76 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शुभम बालाराम जंगेल (24, रा. शिवशंभूनगर, भरतवाडा), सागर रमेश चाैधरी (27, रा. शीतलामाता मंदिराजवळ, शिवशंभूनगर, कळमना), श्रेयस अमरदीप यादव (23, रा. जामनगर, भरतवाडा) आणि वंश संताेष सिन्हा (19, रा. नवीननगर, पारडी) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत.
 

गुन्हा शाखा  
 

गुन्हे शाखेच्या घराेडी विराेधी पथकाचे प्रमुख पाेलिस निरीक्षक दिलीप चंदन यांना आराेपी शुभम जंगेल याच्याकडे पिस्तूल व जिवंत काडतूसे असल्याची गाेपनीय माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे (डिटेक्शन) उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त डाॅ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात घराेडीविराेधी पथकाचे निरीक्षक दिलीप चंदन यांनी आराेपी शुभमला ताब्यात घेऊन चाैकशी केली. त्याने आपला मित्र सागर चाैधरी याने पिस्तूल विक्रीसाठी दिल्याचे सांगून हा पिस्तूल आराेपी सागरकडे असल्याची माहिती दिली. पाेलिसांनी शुभमच्या घराची झडती घेऊन दाेन जिवंत काडतुसे व माेबाइल जप्त केला. पाेलिसांनी आराेपी सागरला ताब्यात घेतले असता सागरने आराेपी श्रेयस याने पिस्तूल विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. परंतु, विक्री न झाल्याने पिस्तूल श्रेयसला दिल्याची माहिती दिली. त्यानंतर पाेलिसांनी आराेपी श्रेयसला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ देशी कट्टा आढळला.crime squad हे पिस्तूल आराेपी यशकडे ठेवण्यास दिल्याचे सांगितले. पाेलिसांनी वंशला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ 2 पिस्तूल, 4 मॅगझिन व 32 जिवंत काडतुसे आढळली. पाेलिसांनी आराेपींना अटक करून न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.
उत्तरप्रदेशातून आणले पिस्तूल
गेल्या अनेक वर्षांपासून मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशातून नागपुरात पिस्तूल विक्रीसाठी येत असते. गुन्हे शाखेच्या तपासात आराेपी श्रेयस यादव याने पिस्तूल विकून ना मिळविण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेशातील आपल्या नातेवाइकाकडून 35 हजार रुपयांप्रमाणे पिस्तूल विकत आणल्याची माहिती दिली. दरम्यान, आराेपी देशी कट्टा काेणाला देणार हाेते, यापूर्वी त्यांनी काही पिस्तूल विकली आहेत काय, याचा तपास करण्यात येत आहे.