डेन्व्हर,
Salinity in the Indian Ocean हिंद महासागर, जो पृथ्वीवरील सर्वात खारट महासागरांपैकी एक मानला जातो, गेल्या काही दशकांत बदलत्या परिस्थितीमुळे खारटपणात लक्षणीय घट झाली आहे. कोलोरॅडो विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्याजवळील दक्षिण हिंद महासागरातील खारटपणा गेल्या ६० वर्षांत सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाला आहे. संशोधकांच्या मते, हवामान बदलामुळे या घटेचे मुख्य कारण आहे. जागतिक तापमानवाढेने महासागराच्या पृष्ठभागावरील वारे बदलले आहेत आणि या बदलांमुळे सागरी प्रवाह गोड्या पाण्याच्या साठ्याचे पाणी दक्षिण हिंद महासागराकडे वाहून नेत आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची घनता आणि खारटपणा कमी होत आहे.

हा बदल भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. हिंद महासागरातील बदलांचा थेट परिणाम मान्सूनच्या पद्धती, पर्जन्यमान, सागरी मासेमारी आणि किनारपट्टीतील हवामानावर होतो. जागतिक स्तरावर, महासागर प्रवाह बदलल्यास युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील तापमानावरही परिणाम होतो. तज्ञांचे म्हणणे आहे की खारटपणातील घट महासागर आणि हवामान यामधील परस्परसंवाद बदलवू शकते. खारटपणा कमी झाल्यास जागतिक हवामानाचे नियमन करणाऱ्या महासागर अभिसरण प्रणालींवरही परिणाम होऊ शकतो.
ऑसत खारटपणा सुमारे ३.५ टक्के असतो, पण महासागरातील भागानुसार ही पातळी बदलत राहते. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या नैऋत्य किनाऱ्याजवळील दक्षिण हिंद महासागर अत्यंत खारट आहे, तर उत्तर गोलार्धातील उष्णकटिबंधीय भागातील पूर्व हिंद महासागर आणि पश्चिम प्रशांत महासागर तुलनेने कमी खारट आहेत. खारटपणातील हा फरक महासागर अभिसरण प्रणाली तयार करतो, जो पृथ्वीभर उष्णता, मीठ आणि गोड्या पाण्याचे संतुलन राखतो.