शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा !

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
नागपूर,
Shivaji Maharaj Jayanti शिवजन्मोत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त इतिहासातील या महान घटनेची आठवण काढत नागरिकांनी अभिमानाने शिवजन्मोत्सव साजरा केला.
 

chart 
 
कित्येक वर्षे हिंदुस्थानावर परकीय सत्तांचा जुलूम आणि अराजकता माजलेली असताना सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या किल्ले शिवनेरी येथे राजमाता जिजाबाई यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माने स्वराज्याची पहिली ठिणगी पेटली आणि हिंदुस्थानच्या इतिहासाला नवी दिशा मिळाली, Shivaji Maharaj Jayanti असे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केले.कार्यक्रमात शिवचरित्राचे वाचन, व्याख्यान, तसेच शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.शिवजन्मोत्सव हा केवळ ऐतिहासिक दिवस नसून स्वराज्य, संस्कृती आणि स्वाभिमानाची जाणीव जागवणारा पवित्र उत्सव असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
 
सौजन्य:तेजेंद्र गिराडे,संपर्क मित्र