वर्धा,
sangh geet program राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त काल १८ रोजी सायंकाळी स्थानिक शिवशंकर अग्निहोत्री सभागृहात राष्ट्रीय संस्कार मंडळाच्या वतीने राष्ट्र आराधना संघगीत कार्यक्रम केवळ सांस्कृतिक उपक्रम न राहता राष्ट्रभक्तीची अनुभूती देणारा सोहळा ठरला. शिस्त, एकात्मता आणि सेवाभाव यांचा जागर करणार्या संघगीतांच्या स्वरांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. प्रत्येक संघगीत सभागृहात बसलेले स्वयंसेवक ओठांवर गीतांनी प्रतिसाद देत टाळ्यांनी दाद देत होते. यानिमित्ताने जिल्ह्यातील दिवंगत प्रचारकांच्या कार्याला उजाळा मिळाला. प्रत्येक गायकाच्या गळ्यातील एक सारखे भगव्या दुपट्ट्यांनी लक्ष वेधून घेतले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनातील एक भाग म्हणून राष्ट्रीय संस्कार मंडळाच्या वतीने आयोजित या राष्ट्र आराधना संघगीत कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पुर्वसंध्येला शिवाजी महाराजांचे स्मरण म्हणून प्रसिद्ध गायक केतकी कुळकर्णी यांच्या स्वरांनी हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी या गाण्यातून स्वराभिकेत केला आणि डॉ. सुमंत पांडे यांनी विश्व मे गुंजे हमारी भारती हे भारत मातेला आळवणारे गीत सादर केले. केतकी कुळकर्णी यांनी सर पे हिमालय का छत्र है, प्राची फडके यांनी भारत हमारी माँ है, हर्षद फडके यांनी संस्कृती सबकी एक चिरंतन, अविनाश देशपांडे यांनी दाही दिशांना जाऊ फिरू, सतिश देशमुख यांनी नमो मात्रृभूमी आणि व्हावे जीवन यज्ञ समर्पण, डॉ, सुमंत आणि रेणुका यांनी मातृ मंदिर का समर्पित दीप, विवेक सावरकर यांनी मनसा सततम्, वर्षा बल्लाळ यांनी साधना के देश, डॉ. हर्षद आणि डॉ. प्राची फडके यांनी निर्माणों के पावन युगमे, संजय जोशी आणि कवी नेसन यांनी सेवा है यज्ञ कुंड हे गीत सादर केले आणि संपुर्ण सभागृह एकरूप झाले. प्रत्येक स्वयंसेवकाच्या ओठी सेवा है यज्ञ कुंड या ओळी गुंजत होत्या आणि अखेर टाळ्यांच्या कडकडाटात सभागृह निनादून गेले. धनंजय भट यांनी धनधान्य पुष्पे भोरा आणि चाहीये आशीष माधव हे संघातील आवडते गीत सादर केले आणि सभागृह आणि टाळ्या एकरूप झाले, श्रीफळ शेंडे आणि शेखर केळकर यांनी आखो जबी जादो (आसामी), धनंजय बल्लाळ यांनी कन्नड गीत सादर केले. शेखर केळकर यांनी पिता वारीया ते आणि राम जी की सेना चली हे दोन गीतं सादर केले.sangh geet program अश्विनी जलताडे यांनी हिंदू राष्ट्र संघटकम्, प्रशांत दुधाने यांनी चार गीतांंची मेजवाणी दिली. यात गलत मत कदम उठावो, एकता- स्वतंत्रता- समानता, जननी जन्म भुमी आणि शपथ लेना तो सरल है ही चार गीत सादर केली. रामभाऊ वखरे यांनी ध्यास एक साधका आणि सौगंध राम की खाते है हे गीत सादर करून अयोध्येतील रामजन्मभुमीच्या आंदोलनाची आठवन करून दिली. कवी नेसन यांनी लो श्रद्धांजली राष्ट्रपुरुष तर चरैवेती चरैवेती आणि हम करे राष्ट्र आराधना या सांघिक गीतात अख्खे सभागृह जणू सहभागी झाले होते. केतकी कुळकर्णी यांच्या वंदे मातरम् ने समारोप झाला. प्रेक्षक आणि गायक यांच्यातील सेतू निवेदनातून अतुल रासपायले यांनी बांधला.
कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे नगर संघ चालक डॉ. प्रसाद देशमुख, तालुका संघ चालक हिरामन पारिसे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, संजीव लाभे, वर्धा नागरी बँकेचे संचालक जयंत येरावार, माधव पंडित, विजय कुळकर्णी, नगरसेवक निलेश पोहेकर, माजी नगरसेवक श्रेया देशमुख, भाजपाचे महामंत्री अशोक कलोडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी वर्धा जिल्ह्यात प्रचारक म्हणून जबाबदारी सांभाळणारे प्रांत प्रचारक सांभाळ प्रमुख सुनिल कुळकर्णी, ग्रंथालय भारती संघटन सचिव राजेश राठोड, चंद्रपूर विभाग छात्रावास प्रमुख प्रशांत कावरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्व. मनोहर आणि लता देशपांडे यांच्या स्नुषा वंदना प्रमोद देशपांडे यांनी भावना व्यत केल्या. आभार राष्ट्रीय संस्कार मंडळाचे अध्यक्ष विवेक सावरकर यांनी मानले. यशस्वीतेकरिता राष्ट्रीय संस्कार मंडळाच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले. मंगेश परसोडकर आणि केतकी कुळकर्णी यांच्या नेतृत्वात अवघ्या आठ दिवसात स्थानिक कलाकारांनी आठ दिवस परिश्रम घेत हा प्रयोग यशस्वी केला.