हिंदी विश्वविद्यापीठाला शिवजयंतीची सुटीच नाही!

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
वर्धा, 
hindi university संपूर्ण महाराष्ट्र १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करतो. या दिवसाचे विशेष महत्त्व लक्षात घेता शासनसुद्धा शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करते. मात्र, वर्धेतील आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाला सुटीच जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरूंना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा विसर तर पडला नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
 
हिंदी विश्वविद्यापीठा
 
 
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही महाराष्ट्रातील घराघरात हा दिवस सणासारखा साजरा केला जातो. शासनसुद्धा या दिवसाचे विशेष महत्व लक्षात घेत विविध कार्यक‘मांचे आयोजन करतो. सर्व शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयांना सुटी असते. मात्र, वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी कार्यक‘माचे आयोजन तर सोडाच, पण साधे प्रतिमा पूजन सुद्धा करण्यात आले नाही. हे राज्यातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ असून राज्यातील सर्व शासकीय संस्थांमध्ये कार्यक‘माचे आयोजन व अवकाश घोषित करण्यात आले असून हिंदी विद्यापीठात यावर्षी सरकारी सुटी सुद्धा जाहीर करण्यात आली नाही.hindi university या आधी मात्र दरवर्षी विद्यापीठाकडून सुटी जाहीर करण्यात येत होती. त्यामुळे विद्यमान कुलगुरूंना छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर तर पडला नाही ना, असा प्रश्न विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
देशाच्या उभारणीत छत्रपती शिवाजी महाराजांचे विशेष योगदान असून त्यांच्या जयंतीदिनी विद्यापीठाकडून साधं अभिवादन सुद्धा करण्यात येत नाही, हा महापुरुषांचा अपमान निंदनीय असून, कुलगुरूंनी यावर जाहीर माफी मागावी, असा सूरही उगारला जात आहे.

या संदर्भात विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, महात्मा गांधी हिंदी विश्व विद्यापीठाला गणेश चतुर्थी, होळी आणि रामनवमी या स्थानिक तीन सुट्या देण्याची परवानगी आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सुट्टी विद्यापीठाने दिलेली नाही. विद्यापीठांमध्ये ‘सन्मान शिवाजी महाराजांचा’ कार्यक‘म आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी तरुण भारत सोबत बोलताना सांगितले.