टेक्सा,
truck-overturns-on-road-texas माणूस कितीही ताकदवान असला तरी, तो निसर्गाच्या शक्तीसमोर काहीही नाही. अशाच निसर्गाच्या धक्कादायक सामर्थ्याचे उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत दिसते. टेक्सासमधील डुमास येथे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे एक भलामोठा ट्रक रस्त्यावरून जाताना अचानक पलटी होतो.

व्हिडिओत दिसते की सुरुवातीला ट्रक सामान्यपणे रस्त्यावर चालतो, तर इतर वाहने देखील त्यांच्या मार्गाने जात आहेत. पण काही क्षणांनंतर वाऱ्याच्या रौद्ररुपामुळे ट्रक डगमगतो आणि पलटी मारतो. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्या वेळी हवेत ३० ते ४० मैल प्रतितास वेगाने वारे वाहत होते. हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर एक्स प्लॅटफॉर्मवर @dineshdangi84 या आयडीवर शेअर करण्यात आला आहे. truck-overturns-on-road-texas त्यात सांगितले आहे की १ मिनिट १० सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाख ७६ हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे, तर काहींनी प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, “कमालीची गोष्ट आहे, कारला काही झालं नाही, पण ट्रक पलटी झाला.” हा घटनेचा व्हिडिओ निसर्गाच्या सामर्थ्याची खरी ताकद दर्शवतो आणि माणसाच्या मर्यादांची जाणीव करून देतो.
सौजन्य : सोशल मीडिया