वीज चोरी आली अंगलट

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Yavatmal electricity theft case, महावितरणच्या भरारी पथकाने येथील नेहरू चौकातील जिरापुरे कॉम्प्लेक्समधील दुकान क्रमांक 721 आणि जारा कलेक्शन व मॅचिंग सेंटरमध्ये धाड टाकत पकडलेल्या वीज चोरी प्रकरणी सहायक अभियंता संजय महानूर यांच्या तक्रारीवरून विद्युत कायदा 2003 कलम 135 व कलम 138 अंतर्गत यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Yavatmal electricity theft case,  
महावितरणने वीज चोरीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली असून, भरारी पथकाच्या माध्यमातून जिल्हाभर धाडसत्र राबविण्यात येत आहे. वीज चोरी कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे वीज चोरी करणाèयावर महावितरणमार्फत गुन्हा दाखल करण्याच्या स्पष्ट सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महावितरणच्या कारवाई दरम्यान अडथळा आणू नये आणि वीज चोरी करू नये असे आवाहन अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केले आहे. गेल्या 22 जानेवारीला महावितरणच्या भरारी पथकाने मारलेल्या धाडीत महावितरणचे ग्राहक क्रमांक 370014040341, ग्राहक अमिनखान सिकंदरखान यांच्या नावे असलेल्या व्यावसायिक मिटरमध्ये छेडछाड केल्याचे तसेच मिटरच्या मागील बाजूस चुंबक लावून विजेचा अनधिकृत वापर करीत असल्याचे आढळले.
 
 
तसेच जारा कलेक्शन Yavatmal electricity theft case, व मॅचिंग सेंटर, ग्राहक क्रमांक 370011044061 यांनी वीज वापरकर्ता मोहंमद साजिद मोहंमद शकील जिंद्रान, वीज बिलावरील नाव मेहरूनिस्सा बानो मोहंमद शकील जिंद्रान यांनी मिटर अनधिकृतपणे उघडून मिटरशी छेडछाड केली असल्याचे निदर्शनास आले होते.महावितरणकडून पंचनामा केल्यानंतर अमिनखान सिकंदरखान या ग्राहकाने 11 हजार 72 युनिट आणि 2 लाख 53 हजार 140 रुपयांची वीज चोरी केल्याचे, तर मोहंमद साजिद मोहंमद शकील जिंद्रान या व्यावसायिक ग्राहकाने 9 हजार 706 युनिट आणि 2 लाख 93 हजार 560 रुपयांची वीज चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले.
या दोन्ही वीजचोरी प्रकरणांत देण्यात आलेल्या रकमेचा भरणा करून तडजोड करण्याची संधी असतानाही संबंधित ग्राहक तडजोडीसाठी पुढे आले नाहीत. त्यामुळे विद्युत कायदा 2003 सुधारित 2007 कलम 152 (2) अंतर्गत तडजोड न झाल्याने विद्युत कायदा 2003 सुधारित 2007 कलम 135 व 138 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.