नागपूर,
Shiv Jayanti समर्थ नगर पूर्व बस्तीमध्ये ‘विराट हिंदू संमेलन’ या कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आली होती. ही दिंडी चुनाभट्टी येथील हनुमान मंदिरापासून सुरू होऊन प्रशांत नगर येथील हनुमान मंदिरात समारोपास आली. या दिंडीत लहान बालगोपालांनी विविध ऐतिहासिक व पारंपरिक वेषभूषा साकारत कार्यक्रमाची शोभा वाढवली. महिलांनी साडीचा एकसमान रंगाचा ड्रेस कोड ठेवून उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. एकूण सुमारे १५० ते १६० महिला, पुरुष आणि बालगोपाल या दिंडीत सहभागी झाले होते.
दिंडी मार्गक्रमण करत असताना “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “भारत माता की जय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. समारोपस्थळी बालगोपालांनी सादर केलेल्या उत्कृष्ट नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. लहान मुलांमधील उत्साह विशेष कौतुकास्पद ठरला. Shiv Jayanti कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना प्रसाद व अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. अशा प्रकारे उत्साहपूर्ण वातावरणात या यशस्वी कार्यक्रमाची सांगता झाली. सहभागी सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार ठरला.
सौजन्य: सुरेश चव्हारे, संपर्क मित्र