मुंबई,
amruta fadnvis महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी तब्बल २३ वर्षांच्या बँकिंग कारकिर्दीनंतर आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे. त्यांनी ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्टद्वारे दिली.
अमृता फडणवीस यांनी Axis Bank मध्ये २३ वर्षांपूर्वी व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली होती. कालांतराने त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळत वरिष्ठ उपाध्यक्ष (Senior Vice President) पदापर्यंत मजल मारली. मात्र आता त्यांनी या पदाचा राजीनामा देत नवीन वाटचालीचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “२३ वर्षांपूर्वी एका तरुण प्रशिक्षणार्थी म्हणून मी अॅक्सिस बँकेत प्रवेश केला. आज वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून निरोप घेताना मन कृतज्ञतेने भरून आले आहे.” शाखा ऑपरेशन्सपासून कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी आणि ग्राहक संबंध अशा विविध विभागांतील अनुभवाचा त्यांनी विशेष उल्लेख केला. तसेच बँकेचे एमडी आणि सीईओ Amitabh Chaudhry यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले.
सामाजिक कार्यात सक्रिय
९ एप्रिल १९७९ रोजी नागपूर येथे जन्मलेल्या अमृता फडणवीस या वित्त विषयात एमबीए पदवीधर आहेत. बँकिंग क्षेत्रासोबतच त्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून गायिका म्हणूनही त्यांची ओळख आहे.amruta fadnvis राज्यस्तरीय १६ वर्षांखालील टेनिस स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता.
मुख्यमंत्री पत्नी म्हणून सार्वजनिक जीवनात असतानाही त्यांनी सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता त्यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.