'पाकिस्तानी सैनिकांची जीवाची भीक', बीएलएने ओलिसांचा VIDEO केला जारी

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
इस्लामाबाद, 
bla-releases-video-of-pakistani-soldiers पाकिस्तानच्या नैऋत्य भागातील बलुचिस्तानमध्ये सुरक्षा परिस्थिती गंभीर आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने येथे केवळ पाकिस्तानी सैन्याला आव्हान दिलेले नाही, तर अनेक सैनिकांना ताब्यातदेखील घेतले आहे. बीएलएच्या मीडिया विंग हक्कल मीडियाने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये काही पाकिस्तानी सैनिक गुडघ्यावर बसून जीवाची याचना करताना दिसत आहेत.
 
bla-releases-video-of-pakistani-soldiers
 
व्हिडिओमध्ये पकडलेल्या सैनिकांनी आपली लष्करी ओळखपत्रे दाखवत सांगितले की ते नियमित सैनिक आहेत आणि त्यांना अधिकृतपणे नेमणूक करण्यात आली होती. हे दावे पाकिस्तानच्या सैन्याने केलेल्या आधीच्या विधानाला आव्हान देतात, ज्यात सांगितले गेले होते की कोणताही सैनिक बेपत्ता नाही किंवा अतिरेकी ताब्यात नाहीत. बीएलएने स्पष्ट केले आहे की हे सैनिक ‘ऑपरेशन हेरोफ २.०’ दरम्यान पकडले गेले होते. bla-releases-video-of-pakistani-soldiers बीएलएच्या म्हणण्यानुसार, हे त्यांच्या विद्रोही मोहिमेचा एक भाग आहे, ज्यामध्ये त्यांनी २०२५ च्या मध्यापासून बलुचिस्तानमधील सरकारी सुरक्षा दलांवर आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ले तीव्र केले आहेत. व्हिडिओत एक सैनिक म्हणतो की, “मी पाकिस्तानसाठी लढलो, पण आता सैन्याने मला सोडून दिले आहे.” पकडलेल्या सैनिकांचे रडणे आणि त्यांच्या सुटकेसाठी विनवणी करताना दिसणे, या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित करते.
सौजन्य : सोशल मीडिया  
या घटनेमुळे बलुचिस्तानमधील सुरक्षा परिस्थिती, सरकार आणि सैन्यादरम्यानचा संघर्ष, तसेच विद्रोही गटांकडून निर्माण होणाऱ्या आव्हानांचा दाखला मिळतो. bla-releases-video-of-pakistani-soldiers बीएलएच्या या कारवायीनंतर पाकिस्तानी सैन्य आणि प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे, तर या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष वेधले जात आहे.