प्रकृती खालावल्याने छगन भुजबळ रुग्णालयात दाखल!

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Chhagan Bhujbal admitted to hospital मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. या परिस्थितीमध्ये तातडीने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंता पसरली आहे.
 
 
chhagan bhujbal
 
माहिती मिळाल्याप्रमाणे, आज सकाळी छगन भुजबळ यांना पोटात दुखू लागले. त्यानंतर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात त्यांचे सीटी स्कॅन व इतर काही तपासण्या करण्यात आल्या. मात्र प्रकृती अजून खालावल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयात छगन भुजबळ यांच्यावर सविस्तर उपचार केले जातील. या पार्श्वभूमीवर त्यांच्या आजच्या सर्व दौऱ्यांचे आयोजन रद्द करण्यात आले असून, कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.