शिव जयंती शोभायात्रेत कटरने वार

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |

Cutter attack during Shiv Jayanti
 
 
 
हिंगणघाट,
Cutter attack during Shiv Jayanti शिवाजी महाराज जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत नाचताना झालेल्या धकाबुकीवरून शिवम राजू दाभणे (१७) रा. तेलंगखडी या युवकावर कटरने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवार १९ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास शहरातील एचडीएफसी बँकेजवळील मुख्य मार्गावर घडली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत डीजेच्या तालावर नाचताना धुंदीत झालेल्या धकाबुकीवरून झालेल्या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. शिवम दाभणे याच्या चेहरा व कानावर कटरने सपासप वार करीत गंभीर जखमी केले. जखमीला तात्काळ स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉटरांनी जखमीला पुढील उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी अल्पवयीन मुलास अटक केली आहे.