एपस्टीन प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक खुलासा; “तो सायकोपॅथ होता, मी अडकली..."

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
वॉशिंग्टन,  
epstein-case-victim जेफ्री एपस्टीन प्रकरणातील एक पीडिता म्हणून पुढे आलेल्या रीना ओह यांनी अनेक वर्षांनंतर आपल्यावर झालेल्या मानसिक आणि भावनिक छळाबाबत गंभीर आरोप केले आहेत. सध्या चाळीशी ओलांडलेल्या रीनाने सांगितले की, १९९० च्या उत्तरार्धात ती अवघ्या २१ वर्षांच्या होत्या आणि कला शिक्षण घेत करिअर घडवण्याचा प्रयत्न करत होती. याच काळात तिचा संपर्क जेफ्री एपस्टाईनशी याच्याशी आला. सुरुवातीला त्याने कोणत्याही अटींशिवाय बॅचलर ऑफ फाइन आर्ट्ससाठी शिष्यवृत्ती देण्याची ऑफर दिली, असे त्या सांगते. “तुला पुन्हा माझी भेट घ्यावी लागणार नाही,” असे आश्वासन देण्यात आले होते; मात्र नंतर वारंवार भेटीसाठी दबाव टाकला जाऊ लागला.
 
epstein-case-victim
 
रीनाच्या म्हणण्यानुसार, तिने नकार दिल्यानंतर शिष्यवृत्ती काढून घेण्याची धमकी देण्यात आली. फ्लोरिडामधील त्याच्या इस्टेटवर गेलेल्या एका भेटीचा उल्लेख करताना ती म्हणाली की तेथे ती पूर्णपणे एकटी आणि घाबरलेल्या अवस्थेत होती. बाहेर पडण्यासाठी ना पुरेसे पैसे होते, ना प्रवासाची सोय. इस्टेटमध्ये ठरावीक पद्धतीने लोकांना ‘मसाज रूम’मध्ये नेले जात असल्याचे तिला जाणवले. एपस्टीनचे वर्तन, फोन कॉल्स आणि संवाद पाहता काहीतरी बरोबर नसल्याची जाणीव झाली. याबाबत आवाज उठवला तर शारीरिक इजा करण्याची धमकी देण्यात आली, असा आरोप तिने केला. epstein-case-victim “मी जाळ्यात अडकले होते,” असे ती म्हणाली. रीना ओहने एपस्टीनला संतापी आणि स्वकेंद्रित व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करत सांगितले की तो केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आणि भावनिक नियंत्रण ठेवत असे. अशा अनुभवातून सावरण्यास दशकांचा कालावधी लागतो, असे तिने नमूद केले. संपूर्ण जाळ्याची चौकशी व्हावी आणि सर्व संबंधितांची जबाबदारी निश्चित व्हावी, अशी तिची मागणी आहे.
सौजन्य : सोशल मीडिया 
ब्रिटनचे किंग चार्ल्स यांचे बंधू प्रिन्स अँड्र्यू वरील कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना तिने ती केवळ सुरुवात असल्याचे म्हटले. तिच्या मते, अमेरिकेतही सर्व संबंधितांची शपथपूर्वक चौकशी झाली पाहिजे. epstein-case-victim ज्यांची नावे प्रकरणातील कागदपत्रांत आहेत, त्यांना समोर आणून प्रश्न विचारले जावेत. ट्रंप यांचे नाव चर्चेत आले असल्यास त्यांनीही साक्ष द्यावी, अशी भूमिका तिने मांडली. २०१९ मध्ये एपस्टीनच्या अटकेनंतर रीनाने स्वतःची ओळख जाहीर करत इतर पीडितांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वैयक्तिक गोपनीयतेचा त्याग करावा लागला, असे ती सांगते. एका अन्य पीडितेने आपल्या अप्रकाशित आठवणींमध्ये चुकीचे उल्लेख केल्याने त्यांना मानहानीचा दावा दाखल करावा लागला होता. “मी गुन्हेगार नाही, तर पीडित आहे हे सिद्ध करावे लागले,” असे तिने स्पष्ट केले.
पैसा आणि सत्तेच्या जोरावर प्रभावशाली लोक चौकशीपासून सुटतात, असा आरोप करत तिने प्रकरणातील लाखो कागदपत्रे अजूनही सार्वजनिक न झाल्याचे निदर्शनास आणले. पूर्ण पारदर्शकता आणि सर्व तथ्ये उघड होईपर्यंत समाधान मिळणार नाही, असे ती म्हणाली. तिच्या मते, खरी न्यायप्रक्रिया तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा प्रत्येक नाव उघड होईल आणि प्रत्येक संबंधित व्यक्ती शपथ घेऊन उत्तर देईल.