सीबीएसई दहावीच्या परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न

शिक्षकांनी व्यक्त केला संताप

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
नागपूर,
cbse10th exams केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षा मंगळवारपासून देशभरासह नागपुरात सुध्दा सुरू झाल्या. पहिला पेपर हा गणित विषयांचा यात प्रामुख्याने सेट क्रमांक २ आणि सेट क्रमांक ३ मधील प्रश्न दिलेल्या अभ्यासक्रमाबाहेरील विचारण्यात आल्याची तक्रार शिक्षकांसह विद्यार्थी, पालकांनी केली आहे. एकीकडे दिल्ली विभागातील सीबीएसई परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना सोपे प्रश्न तर महाराष्ट्र विभागातील पेपर सेट कठीण विचारण्यात आल्याने शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.
 
 
sbse
 
 
सीबीएसईची परीक्षा देणार्‍या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकसमान असताना प्रश्नपत्रिका मात्र वेगवेगळया आणि अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न विचारण्यात आल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारे आहे. सीबीएसईची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वेगवेगळा सेट दिल्या जातो. जेव्हा एकसारखा अभ्यासक्रम असताना महाराष्ट्र विभागातील पेपरमध्ये विद्यार्थ्यांना शिकविलेल्या अभ्यासक्रमापेक्षा अतिशय वेगळया पध्दतीने प्रश्न देण्यात आले.cbse10th exams अशाप्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांसाठी गोंधळ घालणारे ठरले अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न न विचारल्याने मूल्यांकनावर परिणाम होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे.