शहरात अनेक ठिकाणी गुंजला ‘जय शिवराय’ चा गजर

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
गडचिरोली,
Gadchiroli Shivaji Jayanti, गडचिरोली शहरात विविध ठिकाणी ‘जय भवानी, जय शिवाजी’ ‘जय शिवराय’ चा गजर गुंजला. निमित्त होते रयतेच्या राजाच्या जन्मोत्सवाचे. या जयघोषाने जिल्ह्याचा आसमंत अक्षरशः दुमदुमून गेला. शहराच्या मुख्य मार्गावरून जेव्हा शिवरायांची घोडे, रथासह पालखी निघाली, तेव्हा जणू प्रत्यक्ष ‘शिवशाही’ अवतरल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
 

Gadchiroli Shivaji Jayanti, 
सळसळत्या उत्साहात इतिहासाचा धांडोळा घेणार्‍या मिरवणुका, जय शिवराय असा जयघोष आणि भगव्या पताकांसह इंदिरा गांधी चौकात झालेली फटाक्यांची आतषबाजी अशा शितमय वातावरणाने शहरवासीयांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. शहरात सकाळपासून शिवजयंतीचा उत्साह दिसत होता. शहरातील मुख्य रस्ते व चौक भगवे डोंडे व शिवरायांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर, पोस्टर्सने झाळकत होते. सायंकाळी सहा वाजेनंतर निघालेल्या भव्य मिरवणुकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिवकालीन इतिहासाचा जिवंत धांडोळा घेणारे चित्ररथ, गड-किल्ल्याचे हुबेहूब देखावे आणि जिजाऊंच्या लेकींचा कपाळावरील चंद्रकोर अन् नऊवारीतील तो डामडौल... हे सारे काही विलोभनीय होते. घोड्यावर स्वार झालेले बालमावळे आणि हातात भगवे ध्वज घेऊन चालणारी तरुणाई पाहून प्रत्येकाचा उर भरुन येत होता. पाळणा म्हणताना आणि पाळणा म्हणताना आणि पडताना अनेकांचे डोळे भक्तीने पाणावले होते. पाळणा सजवून, त्यावर फुलांची उधळण शवराया प्रतिमेला पाळण्यात झुलवतानाचा तो क्षण अतिशय मंगलमय होता. ढोल-ताशांच्या कडकडाटातही या पाळण्याच्या सुरांनी उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला.
शहरातील इंदिरा गांधी चौकात विविध ठिकाणांहून मिरवणुका दाखल झाल्या. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रणोती सागर निबोस्कर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, शिंदेसेनेचे सहसंपर्कप्रमुख हेमंत जंबेवार, न.प. सभापती लिलाधर भरडकर, मुक्तेश्‍वर काटवे, नगरसेवक शेखर आखाडे, सागर निंबोरकर, माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी मंडळाला भेट देऊन शिवरायांच्या चरणी माथा टेकला. राजकीय मतभेद विसरून सर्वच पक्षांचे नेते शिवरायांच्या या रयतेच्या दरबारात एकवटलेले दिसून आले.