नागपुरात 'श्रीमद् भागवत कथा रहस्य' ग्रंथाचे भव्य प्रकाशन

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
नागपूर
Shrimad Bhagwat Katha Rahasya नागपुरात श्रीमद् भागवत कथेच्या मंगल समाप्तीच्या दिवशी अभूतपूर्व प्रकाशन सोहळा पार पडला. पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांच्या हस्ते आणि पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या आशीर्वादाने भागवताचार्य अंजली सुरेश अनासांनी लिखित ‘व्यास रचित श्रीमद् भागवत कथा रहस्य’ या ग्रंथाचे भव्य प्रकाशन करण्यात आले.
 
Shrimad Bhagwat Katha
 
श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आणि प्रख्यात प्रवचनकार अंजली अनासांनी संपूर्ण १२ स्कंदातील कथा सोप्या आणि सरळ भाषेत मांडल्या आहेत, ज्यामुळे नवीन पिढीला भागवताचे ज्ञान सहज मिळेल आणि महाराष्ट्रात उत्तम भागवतकार घडतील. त्यांनी यापूर्वी ‘श्रीमद् भागवत प्रश्नोत्तरी’, ‘समर्पिता’ आणि ‘चतुश्लोकी भागवत’ हे दर्जेदार लेखन केले आहे. Shrimad Bhagwat Katha Rahasya सोहळ्यासाठी दिल्ली, हरियाणा, बिहार, विशाखापट्टणम तसेच महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, अकोला इत्यादी ठिकाणांतून मान्यवर उपस्थित होते. प्रमुख उपस्थितींमध्ये अजय चौधरी (राष्ट्रीय सचिव, किसान महासंघटन, पाटणा), रितिक चतुर्वेदी (गुडगाव), ऋषिकेश मिश्रा, वीरेंद्र अजमेरा (यवतमाळ) आणि राजूभाऊ कळसकर यांचा समावेश होता.
 
कार्यक्रमादरम्यान नागपूर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका माया अरविंद हाडे यांचा डॉ. डांगरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सोहळा सुरेंद्र आणि ज्योती फिसके यांच्या सहयोगाने आणि श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या पुढाकाराने यशस्वी झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल वाघ यांनी केले, Shrimad Bhagwat Katha Rahasya तर संचालन अनिलभाऊ मालोकर यांनी केले. यशस्वी आयोजनासाठी सुरेश अनासाने, उपाध्यक्ष विलास अनासाने, सचिव अनंत उंबरकर, अरुण सागळे, राजेश दाचेवार, वास्तुशास्त्र तज्ञ डॉ. गोपाल ढोमणे, रूपल दोडके, डॉ. अश्विनी नाशिककर, विवेक अंगाईतकर आणि अशोक हिरुळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य: रुपल दोडके, संपर्क मित्र