किडझी बेलतरोडी येथे शिवजयंती साजरी

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
नागपूर,
Kidzee Beltarodi येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका सौ. श्वेता भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, जिजाऊ आदी ऐतिहासिक व्यक्तिरेखांची वेशभूषा साकारत देशभक्तीपर गीते, नृत्य व अभिनय सादर केला.

kdz  
 
 
यानंतर विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून बेलतरोडी पोलीस स्टेशन येथे भेट दिली.Kidzee Beltarodi पोलिसांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. शिक्षक, पालक व व्यवस्थापनाच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला
सौजन्य :नितीन वाढावी,संपर्क मित्र .