कुरखेडा,
Kurkheda municipal committee election, नगरपंचायत विषय समीतीची वार्षिक निवडणूक मागील काही दिवसापासून नगरपंचायत अंतर्गत सदस्यामधील बेबनाव व कुरबूरीमुळे तनावपूर्ण झाल्या होत्या. मात्र पक्षाचा वरिष्ठ पातळीवरून वेळीच हस्तक्षेप करीत समज देण्यात आल्याने तनाव काहीसा निवडत आज अखेर चारही विषय समीती सभापतीची निवडणूक सर्व सहमतीने अविरोध संपन्न झाली.
कुरखेडा नगरपंचायतीत सुरुवातीच्या वर्षाचा अपवाद वगळता मागील तिन वर्षापासून भाजप, शिवसेना व काँग्रेसचे विद्यमान सर्व नगरसेवक एकत्रित गुण्यागोविंदाने सत्तेत सहभागी होते. मात्र मागील काही दिवसांपासून येथील दोन कोटीचा बांधकाम निविदा प्रक्रियेवरून सत्ताधार्यांतच दोन गट पडले. एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत प्रकरणाने वेगळे वळण घेत न्यायलयात स्वपक्षाचाच नगरसेवकाविरोधात अब्रूनूकसानीचा खटला दाखल करण्यात आला. त्यामुळे तनावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे येथील वार्षिक विषय समीतीची निवडणूक रंजक ठरणार असा कयास लावण्यात येत होता. मात्र परीस्थीची जाणीव होताच अखेर भाजप व शिवसेना पक्षाचा वरिष्ट पदाधिकार्यांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटात समज देत समन्वय घडवून आणला. त्यामुळे आज चारही विषय समितीची निवडणूक अविरोध संपन्न झाली.
यावेळी उपाध्यक्ष बबलू हूसैनी यांच्याकडे बांधकाम समिती पूर्ववत कायम ठेवण्यात आली. तर स्वच्छता वैद्यक व आरोग्य सभापती पदावर भाजपचे सागर निरंकारी, पाणीपूरवठा व जलनिस्सारण समिती सभापती पदावर काँग्रेसची प्राची धोंडणे, महिला व बालकल्याण समिती सभापती पदावर शिवसेनेच्या कांताबाई मठ्ठे, उपसभापती पदावर भाजपच्या दूर्गा गोटेफोडे यांची अविरोध निवड झाली
याप्रसंगी माजी आमदार कृष्णा गजबे, शिवसेना नेते सुरेंद्रसिंह चंदेल, माधवदास निरंकारी, अनिता बोरकर, भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये तसेच भाजप शिवसेना व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रसेनजीत प्रधान तर सहायक म्हणून ुूख्याधिकारी राजकूमार धनबाते यांनी जबाबदारी पार पाडली.