बाप रे...प्रसुती वेदना सहन न झाल्याने पोट ब्लेडने फाडले

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
बहाइच,
Labor pains उत्तर प्रदेशातील बहाइच जिल्ह्यातील नंदवल गावात भयंकर घटना घडली. ३२ वर्षीय एक गरोदर महिला प्रसुती वेदना सहन न झाल्यामुळे स्वत:चे पोट ब्लेडने फाडले. तिचा पती काही महिन्यांपूर्वी मृत्यू पावला होता आणि घरात ती एकटीच होती. वेदना असह्य होऊन तिने हा भयंकर निर्णय घेतला. महिलेच्या पोट फाडल्यामुळे आतड्या बाहेर आल्या आणि ती जोरजोरात ओरडू लागली.
 
 
Labor pains
 
शेजारी राहणाऱ्या महिलांनी मदतीसाठी धाव घेतली. तिला तत्काळ लखनऊच्या केजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे बाळाचा प्रसुती करण्यात आला आणि बाळ सुरक्षित आहे. मात्र महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, वेळेवर मदत न मिळाल्यामुळे आणि बाळंतपणाची भीती जाणवल्यामुळे महिला हे टोकाचे पाऊल उचलले. महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर बाळ सुरक्षित आहे. या घटनेने उत्तर प्रदेशात मोठा खळबळ उडाली आहे आणि स्थानिक चर्चा सुरू आहे.