महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये एसआयआर सुरू होणार!

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Maharashtra SIR to be launched भारतीय निवडणूक आयोगाने देशभरात मतदार यादीच्या पुनरावलोकनासाठी 'विशेष गहन पुनरावलोकन' प्रक्रिया राबवण्याची घोषणा केली आहे. सध्या १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही प्रक्रिया सुरू असून, उर्वरित २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लवकरच सुरू होणार आहे.
 
 
Maharashtra SIR to
 
निवडणूक आयोगाने २३ राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे ही प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले आहेत. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, लडाख, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, दिल्ली, ओडिशा, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा आणि उत्तराखंडमध्ये ही प्रक्रिया राबवली जाईल. बिहारमध्ये ही प्रक्रिया आधीच सुरू झाली असून, इतर राज्यांमध्ये लवकरच राबविली जाणार आहे. या विशेष गहन पुनरावलोकनामुळे मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक होईल.