वर्धेतही एमडी; कारला चौकातून एकाला अटक

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
वर्धा, 
MD in Wardha too रामनगर पोलिसांनी एमडी पदार्थ विक्री करणार्‍यास अटक करून त्याच्याकडून १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कारला परिसरात करण्यात आली. जुनेद खॉ शकील खॉ पठाण (२३) रा. इंदिरानगर, आर्वी नाका, असे अटक केलेल्याचे नाव आहे. कारला चौकात एक इसम दुचाकीने अमली पदार्थ विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पाहणी केली असता एम. एच. ३२- के. वाय. ८५१० क्रमांकाच्या दुचाकीवर जुनेद खॉ शकील खॉ पठाण हा बसून होता. पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला ताब्यात घेतले. दुचाकीची डिकी पाहणी केली असता प्लास्टिकच्या ११ पिशव्यांमध्ये अमली पदार्थ (एमडी) ४.४३ ग्रॅम आढळून आले.
 
 

एमडी पदार्थ विक्री 
 
पोलिसांनी अमली पदार्थ, रोख, मोबाईल, दुचाकी असा १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, पोलिस निरीक्षक अजय भुसारी यांच्या मागृदर्शनात अंबादास टोपले, अमोल चाटे, दिनेश कांबळे, राजू शाहू, योगेश चन्ने, अजहर खान, नितेश वैद्य, घनश्याम पाटील, सचिन पवार, राहुल भोयर, सूरज राठोड, भूषण दांडेकर, प्रशांत शाहू, गजानन मस्के आदींनी केली आहे.