एम.टेकचा विद्यार्थी आशिष ऑनलाईन जुगारात हरला!

चंद्रपूरहून ठोकल्या बेड्या; साडे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
वर्धा, 
M.Tech student loses in gambling उच्च शिक्षित बी. टेक झालेल्या आशिष रेड्डीमल्ला (२६) रा. रयतवारी कॉलनी बायपास रोड, चंद्रपूर हा वन एस या अ‍ॅपद्वारे जुगारामध्ये पैसे हरला. त्या पैशांची उधारी फेडण्यासाठी त्याने वर्धेत पोहोचत चोरीचा मार्ग पत्करला. येथे एका महिलेच्या घरी चोरी केल्यानंतर पोलिसात तक्रार झाली. पोलिसांनी केलेल्या तपासात तो चंद्रपूर येथे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी उच्च शिक्षित आशिष रेड्डीमल्ला (२६) रा. रयतवारी कॉलनी बायपास रोड, चंद्रपूर येथुन अटक केली. त्याच्याकडून ६ लाख ५७ हजार १९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
 
Cutter attack during Shiv Jayanti
 
मिळालेल्या माहितीनुसार, बेद ले-आउट येथील रोमा पटले (४१) या घरी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरी चोरी करून कपाटातील ३ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना तांत्रिक पद्धतीने शोध घेत सराईत गुन्हेगारांबाबत माहिती घेतली. चंद्रपूर येथील अट्टल घरफोडी करणारा आशिष रेड्डीमल्ला याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करून त्याचा शोध घेण्यासाठी चंद्रपूर गाठले. त्याला कामगार चौक बाबूपेठ चंद्रपूर येथून ताब्यात घेतले. चोरीबाबत विचारपूस केली असता त्याने ही चोरी ऑनलाईन वन एस या अ‍ॅपद्वारे जुगारामध्ये हारलेल्या पैशांची उधारी देण्याकरिता केल्याची कबुली दिली. चोरीतील दागिने सराफा कारागीराला विक्री केल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून ६ लाख ५७ हजार १९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
आशिष रेड्डीमल्ला हा उच्च शिक्षित असून तो सध्या चंद्रपूर येथे डिझाईनींग इन मेकॅनिस या विषयात एम.टेक करीत आहे. त्याला ऑनलाईन अ‍ॅपव्दारे लागलेल्या जुगाराच्या व्यसनामुळे आपण घरफोडी करीत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू, पोलिस अंमलदार चंदकांत बुरंगे, सचिन इंगोले, भूषण निघोट, प्रमोद पिसे, अमोल नगराळे, मंगेश चावरे, अरविद इंगोले, राहुल अधवाल, गोविंद मुंडे, स्मिता महाजन आदींनी कली आहे.