पिस्तूल व जिवंत काडतूसांसह एकजण ताब्यात

- गोंदिया शहर पोलिसांची कारवाई

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
गोंदिया,
arrested with pistol गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत पिस्तूल व जिवंत काडतूसांसह एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. अमित कृष्णा राव (३९) रा. रेल्वे हॉस्पीटल जवळ, साऊथ कॉलोनी गोंदिया, ह.मु. नारायण नगर कुडवा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
 

pistul 
 
आगामी काळात होळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून अवैध हत्यार संबंधाने शहरात पाळत ठेवण्यात येत असताना शहरातील पांगोली नदी जवळील महाकाल मंदिर परिसरात एक व्यक्ती पिस्तूल बाळगून फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. याआधारे शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने महाकाल मंदिर परिसरात पाहणी केली असता आरोपी अमित राव हा संशयीतरित्या फिरताना मिळून आला. दरम्यान, त्याला ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याचेकडून एक पिस्तूल (अग्नीशस्त्र) व ३ जिवंत काडतूस मिळून आले. याप्रकरणी सहाय्यक फौजदार कवलपालसींग भाटीया यांच्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात गोंदिया शहर पोलिस ठाण्यात कलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा सहकलम १३५ मपोका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.arrested with pistol ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर पर्वते, डी. बी. पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार, सहाय्यक फौजदार कवलपालसींग भाटीया, पोलिस हवालदार सुदेश टेंभरे, प्रमोद चव्हाण, सतिश शेंडे, दिपक रहांगडाले, निशिकांत लोंदासे, पोलिस शिपाई सुभाष सोनवाने, मुकेश रावते, अशोक रहांगडाले, दिनेश बिसेन, कुणाल बारेवार, प्रमोद शेंडे यांनी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार करीत आहेत.