ट्रम्प यांचा आदेश मिळताच उभे राहिले पाक पीएम; वाकून हृदयावर ठेवला हात आणि...

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
वॉशिंग्टन,  
pakistan-in-board-of-peace अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘बोर्ड ऑफ पीस’च्या पहिल्या बैठकीत एक वेगळीच घटना घडली. भारत–पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावावर आपणच मध्यस्थी करून तो थांबवला, असा दावा ट्रंप यांनी करताच त्यांनी सभागृहातच शरीफ यांना उभे राहण्यास सांगितले. “हे मोठे प्रकरण होते. तुम्ही उभे राहा,” असे म्हणत ट्रंप यांनी स्वतःच्या भूमिकेचे कौतुक केले. त्यानंतर शरीफ यांनी उभे राहून आदराने हात छातीवर ठेवत प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.
 
pakistan-in-board-of-peace
 
ट्रंप यांनी या बैठकीत सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी त्यांनी दोन्ही देशांशी थेट संपर्क साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपले चांगले संबंध असल्याचे नमूद करत त्यांनी, “जर हा प्रश्न सोडवला नाही, तर व्यापार करार पुढे जाणार नाही,” असा इशारा दिल्याचा दावा केला. टॅरिफ धोरणाचा दबाव तंत्र म्हणून वापर केल्यामुळेच युद्धविराम शक्य झाला, असेही त्यांनी सांगितले. तसेच, या हस्तक्षेपामुळे कोट्यवधी लोकांचे प्राण वाचले, असा उल्लेखही त्यांनी केला. बैठकीत बोलताना शहबाज शरीफ यांनीही अमेरिकन नेतृत्वाचे आभार मानले. pakistan-in-board-of-peace ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात परिस्थिती अतिशय संवेदनशील बनली होती आणि दोन्ही देशांतील तणाव वेगाने वाढत होता, असे त्यांनी म्हटले. संघर्षविराम साध्य करण्यासाठी ट्रंप यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सौजन्य : सोशल मीडिया 
दरम्यान, भारताने तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीबाबतचे सर्व दावे यापूर्वीच फेटाळले आहेत. भारताचे म्हणणे आहे की, संघर्षविरामाचा निर्णय दोन्ही देशांच्या लष्कर प्रमुखांच्या (डीजीएमओ) थेट चर्चेनंतर घेण्यात आला. pakistan-in-board-of-peace ७ मे रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. दहशतवादी पायाभूत रचनेवर लक्ष केंद्रित करत ही कारवाई करण्यात आल्याचे भारताने स्पष्ट केले होते. ‘ऑपरेशन पहलगाम’मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून ही मोहीम राबवण्यात आल्याचेही भारताने नमूद केले होते.