नागपूर,
Mahatma Phule Park कोच व नॅशनल रेफ्री यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच पार पडलेल्या २३ व्या नॅशनल पावरलिफ्टिंग स्पर्धेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ६ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य पदके पटकावली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यात भीमराव लांजेवार यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास फुसाटे, मंगेश बंगाले, प्रवीण डेहनकर, गव्हाने, संजय राऊत, विश्वनाथ धकाते, रमेश धोके, डॉ. जय चमेले, डॉ. गेडाम, वेदांत वाढबुधे, हरडे, वाघ, महेश गायकवाड, सूरज शहारे, प्रियांश शेलकर, पंकज कनेरे, नागेश मन्ने, वेदांत बाळबुद्धे, अभिषेक मेश्राम तसेच उद्यानातील ज्येष्ठ नागरिक व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. Mahatma Phule Park उपस्थितांनी “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आयोजन प्रल्हाद खरसणे पाटील तसेच फिटनेस मेनिया जिमचे संचालक राजू पागोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे केले. शेवटी शिवरायांच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सौजन्य: स्मिता बोकारे, संपर्क मित्र