होळीनिमित्त पुणे, मुंबईसाठी ८ विशेष रेल्वेगाड्या

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
नागपूर,
Trains on the occasion of Holi होळी सणानिमित्त प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी ते मार्चचा पहिला आठवडा या कालावधीत ’ट्रेन ऑन डिमांड’ योजनेअंतर्गत मुंबई-नागपूर तसेच पुणे-नागपूर मार्गावर आठ विशेष रेल्वेगाड्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई-नागपूरदरम्यान गाडी क्रमांक ०२१४१/०२१४२ या साप्ताहिक विशेष गाड्या २२ व २४ - फेब्रुवारी रोजी प्रत्येकी दोन फेर्‍या करतील. मुंबईहून गाडी रात्री १२.२० वाजता सुटून दुपारी ३.१० वाजता नागपूरला पोहोचेल. तर, नागपूरहून रात्री ८ वाजता सुटून दुसर्‍या दिवशी दुपारी १.३० वाजता मुंबईत पोहोचेल. या दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. या गाड्यांमध्ये एक एसी द्वितीय श्रेणी, सहा एसी तृतीय श्रेणी, नऊ स्लीपर, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक सामान्य द्वितीय श्रेणी रेल्वेगाड्यांचा समावेश आहे.
 
 

Trains on the occasion of Holi 
 
पुणे-नागपूर-पुणे मार्गावरही विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले गाडी क्रमांक ०१४६९ पुणे-नागपूर विशेष ३ मार्च रोजी दुपारी ३.५० वाजता सुटून पुढील दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. त्यानंतर ०१४७० नागपूर-पुणे विशेष ४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुण्यात दाखल होईल. या गाड्यांमध्ये तीन एसी द्वितीय श्रेणी, १५ एसी तृतीय श्रेणी, एक द्वितीय श्रेणी रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. गाडी क्रमांक ०१४५७ ४ मार्च रोजी दुपारी ३.५० वाजता पुणे येथून सुटेल व पुढील दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४५८ ही नागपूर-पुणे विशेष गाडी ५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता नागपूर येथून सुटेल व त्याच रात्री ११.३० वाजता पुणे स्थानकावर आहे. या रेल्वे गाड्यांना उरुळी, दौंड कॉर्ड अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव व वर्धा या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. या दोन्ही गाड्यांमध्ये एक एसी प्रथम श्रेणी, एक एसी द्वितीय श्रेणी, दोन एसी तृतीय श्रेणी, पाच स्लीपर, सहा सामान्य द्वितीय श्रेणी, एक द्वितीय श्रेणी पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. सर्व गाड्यांचे आरक्षण संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.