प्रेमविवाह केल्यानंतर युवकावर केला चाकूहल्ला

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
stabbed after love marriage कुटुंबियांच्या विराेधात जाऊन प्रेम विवाहानंतर धुमसत असलेल्या वादातून चाैघांनी मिळून एकावर चाकूहल्ला करत त्याला जखमी केले. आकाश (26, रा. मिसाळ ले आऊट) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मूळचा पाचपावली पाेलिस हद्दीतील बुद्धनगर येथील रहिवासी आकाशने काही दिवसांपूर्वीच प्रेम विवाह केला हाेता. त्याच्या प्रेमविवाहाला पत्नीच्या नातेवाईकांचा विराेध हाेता. लग्नानंतर ताे पत्नीसाेबत सप्टेंबर महिन्यापासून जरिपटका भागात भाड्याने राहत हाेता.
 

चाकूहल्ला  
 
 
बुधवारी मध्यरात्री दाेन दुचाकीवरून चाैघांनी त्याला मिसाळ लेआऊमध्ये घराजवळ घेरले. वाद घालत चाैघांनी त्याच्यावर चाकू हल्ला केला. वार चुकवताना चाकू हातावर लागल्याने विकास गंभीर जखमी झाला. आरडाओरड झाल्याने नागरिक जमा झाले. त्यामुळे चाैघेही पसार झाले. माहिती मिळताच घटनास्थळी पाेचलेल्या पाेलिसांनी जखमी आकाशला रुग्णालयात नेले. त्याने पाेलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आकाश हल्लेखाेरांना ओळखत नाही. तरीही त्यांनी वाद घालत आपल्यावर हल्ला केल्याचे सांगितले. या घडामाेडीत ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तेथील सीसीटीव्हीत संपूर्ण घटनाक्रम कैद झाला आहे. त्यावरून पाेलिस हल्लेखाेरांचा शाेध घेत आहेत.
दाेन्ही कुटुंबात जुना वाद
जरिपटका पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश विराेधातही यापूर्वी पाचपावली पाेलिस ठाण्यात सासूवर चाकू हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे. जन्या वादातून या दाेन कुटुंबात यापूर्वीही वाद-हाणामाऱ्या झाल्या आहेत.stabbed after love marriage त्यामुळे आकाशवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर पाेलिस सर्व बाजू तपासून पाहत आहेत. आकाशच्या तक्रारीवरून जरिपटका पाेलिसांनी हल्लेखाेरांवर गुन्हा दाखल केला आहे.