रामटेकमध्ये हिंदू संमेलन उत्साहात साजरे

    दिनांक :21-Feb-2026
Total Views |
रामटेक,
Ambala Ward Ramtek अंबाला वॉर्ड येथील पंचफुलेश्वर महादेव मंदिर परिसरात भव्य हिंदू संमेलन कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमास परिसरातील हिंदू बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
 
tak
 
या प्रसंगी विश्व हिंदू परिषदचे ठाकरे साहेब यांनी हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा आणि हिंदू एकतेबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. हिंदू समाज संघटित राहून धर्मसंरक्षणासाठी कार्य करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. कार्यक्रमास अँड. अनिरुद्ध मदनराव काशीकर यांचीही उपस्थिती होती. Ambala Ward Ramtek‘भारत माता की जय’ आणि ‘हिंदू जगे तो विश्व जगेगा, भारत का विश्वास जगेगा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
सौजन्य:महेंद्र वैद्य,संपर्क मित्र