नवयुग प्राथमिक शाळेत वार्षिक बक्षीस वितरण सोहळा

    दिनांक :21-Feb-2026
Total Views |
नागपूर,
Navyug Primary School राजाबाक्षा येथील नवयुग प्राथमिक शाळेत वर्षभर आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रम व स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाचा समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक कैलासजी शिवणकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
 
Navyug Primary School
तसेच भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजयानंदजी पिंपळापुरे आणि शाळेचे मुख्याध्यापक अजय काळे यांच्या उपस्थितीत वर्षभरातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या व विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन राकेश कडू यांनी केले, तर आभार प्रदर्शन वर्षा नरसापुरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. Navyug Primary School या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
सौजन्य: वर्षा नरसापूरकर, संपर्क मित्र