सोन्याची खरेदी गरीबांसाठी ठरतेय दिवास्वप्न

लग्नकार्यात वाढतोय खर्च

    दिनांक :21-Feb-2026
Total Views |
विजय माहुरे
सेलू,
buying gold देशात कोणत्याच मालाचे १० वर्षांच्या तुलनेत भाव वाढले नसताना सोनं एवढं महाग झालं की, गरीब व मध्यमवर्गीय जनता यापासून दूर राहताना दिसत आहे. सोन्याचा गगनचुंबी दर पाहता गरीबांसाठी आता ते खरेदी करणे म्हणजे दिवास्वप्नच ठरू पाहत आहे.
 

gold 
 
 
लग्नकार्यात जावयासाठी ५ ग्रॅम सोन्याची अंगठी ही शालमुंदी, साक्षगंधाच्या वेळेस दिली जात असत. यात तीन ग्रॅम सोन्याची अंगठी मुलाकडील मंडळी मुलीला देत होते. पण, अलीकडच्या काळात लग्नाच्या प्रथा परंपरा काही प्रमाणात मोडीत निघाल्या असल्या तरी या कार्यक्रमाला आता रिंग सेरेमणी असे म्हटले जात आहे. तरी सुद्धा अंगठीचा मान कायम आहे. परंतु, ही अंगठी खरेदी करणेही आता सर्वसामान्य कुटुंबाला न परवडणारी ठरत आहे. विवाह कार्यातील रूढी-परंपरा पाहता ५ ग्रॅमची अंगठी ८० ते ९० हजारांची होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे अंगठी विना रिंग सेरेमणी करण्याची वेळ पुढील काळात येणार तर नाही ना, असे बोलल्या जात आहे.
सोन्याचे दर १ लाख ६० हजारांच्या वर असताना सोन्याच्या दुकानात दिसणारी गर्दी पाहता हे सोनं खरेदी करतं तरी कोण, हा संशोधनाचा विषय बनला आहे. समाजात एवढी मोठी आर्थिक दरी पडत असताना शासन याचा विचार ही करीत नाही.buying gold त्यामुळे गरीबांच्या मुला-मुलींच्या लग्नात सोन्याविना लग्न पार पाडावे लागत असल्याचे वास्तव आहे.
एक खंडी कापूस म्हणजे एक तोळा सोनं
आमचे आजोबा सांगायचे, कापूस म्हणजे सोनं. म्हणूनच कापसाला पांढरे सोनं म्हणून ओळखले जात. एक खंडी कापूस म्हणजे ४ विंटल एवढा बाजारात विकला तरी एक तोळा सोनं खरेदी करता येत होतं. आताच्या सोन्याच्या भावात कापूस किती विंटल लागायचा याचा हिशोब जर केला तर जवळपास ७ खंडी कापूस लागणार म्हणूनच सोनं हे सर्वसामान्याच्या स्वप्नाला भुरळ घालत असून यापुढे हे दिवास्वप्न ठरणार आहे. तर श्रीमंतांचे सोनं अन् गरीबांची चांदी, असे दिवस तर पुढे येणार नाही ना, अशी चिंता व्यत केली जात आहे.