हिंगणघाट,
Hindu Sammelan Hinganghat, हिंदू जीवनपद्धती ही सनातन संस्कृतीवर आधारित आहे. डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणेने गेल्या शंभर वर्षांत समाजचैतन्य जागवण्याचे कार्य संघाने केले असून, जागतिक स्तरावर हिंदू समाज एकत्र येत असताना आपण सर्वांनी छत्रपती शिवराय यांना अभिप्रेत असलेल्या हिंदू संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विद्या भारतीचे विदर्भ प्रांत सहमंत्री रणदीप बिसने यांनी केले.
येथील गीता मंदिराच्या मैदानात आयोजित विशाल हिंदू संमेलनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. समीर कुणावार तर प्रमुख अतिथी म्हणून नगर संघचालक विनोद नांदुरकर, नप अध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, नगरसेविका सोनू कुबडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. दीप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा कार्यवाह त्रिशूल लोंढेकर, नगर संघचालक विनोद नांदुरकर, वते रणदीप बिसेन यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रत्येकाने आपापल्या घराघरातील मतभेद दूर करून एकात्मतेचा मार्ग स्विकारण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आ. कुणावार यांनी संघाने स्वीकारलेल्या पंचसूत्री कार्यक्रमाचा कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य, पर्यावरण संरक्षण आणि स्वबोध समाजजीवनात व्यापक प्रसार करण्यावर भर दिला. पारंपरिक आचार-विचार, सण-उत्सव आणि संयुत कुटुंब पद्धतीचे संवर्धन करण्याचे आवाहनही यावेळी वत्यांनी केले.यावेळी काही भजनी मंडळांचा सत्कार आ. कुणावार, नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक व संचालन टिळक वस्ती प्रमुख गौरव तांबोळी यांनी केले. यावेळी गाडगेबाबा वस्ती प्रमुख गणेश धकाते, संयोजक ईशान खंदार, सहसंयोजक सतीश खोंडे, सामाजिक कार्यकर्ते देवा कुबडे, नरेश युवनाथे, धनंजय बकाने, दीपक चौधरी, नगरसेवक रोहित हांडे, विक्रांत भगत, भास्कर शेंडे, रवी बुरीले, सोनू पांडे, सनी बासनवार, रवी काटोले उपस्थित होते.