जैन श्वेतांबर चंद्रप्रभ मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात

धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

    दिनांक :21-Feb-2026
Total Views |
वर्धा,
Jain Shwetambar Chandraprabhu Mandir Wardha, जैन श्वेतांबर चंद्रप्रभ मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आणि ध्वजारोहणानिमित्त १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान पाच दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आज शनिवारी २१ रोजी १०८ दिव्यांनी आरती आणि द्वार उद्घाटन करून उत्सवाचा समारोप झाला. यावेळी गुरू भगवान कविरत्न प्रशम्रती विजय उपस्थित होते.
 

 Jain Shwetambar Chandraprabhu Mandir Wardha, 
पाच दिवस झालेल्या या कार्यक्रमात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संगीतकार आणि गायक मनीष मेहता अ‍ॅण्ड पार्टी जवरा यांच्या संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पाच दिवसांत विविध पूजा करण्यात आल्या. १८ अभिषेक पूजा, पंच कल्याणक पूजा, अनंत लब्धिनिधन गौतम स्वामी महाराज पूजा, श्री सिद्ध सहस्त्र नाम अभिषेक पूजा आणि सत्तार भेदी पूजा आदी कार्यक्रम झाले. प्रशम्रती विजय एम.एस. यांनी मार्गदर्शन केले. १९ रोजी सकाळी १० वाजता शहरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर धार्मिक मेळाव्यात
गुरुदेव, कवी रत्न प्रशम्रती विजयजी एम. एस. यांनी मार्गदर्शनकेले. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ प्रमुख पाहुणे होते. आपण नगराध्यक्ष नव्हे तर सेवक म्हणून येथे उपस्थित असल्याचे सांगितले.
पहिल्या चार रात्री भजन संध्या झाली. १७ रोजी पुलगाव येथील अरिहंत नाहटा बंधू यांच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुसर्‍या दिवशी मनीष मेहता यांच्या भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २० रोजी १२५ वा ध्वजारोहण समारंभानिमित्त चंद्रप्रभा स्वामी यांचा अभिषेक समारंभ झाला. यावेळी पालकमंत्री पंकज भोयरप्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला नागपूर, हिंगणघाट, पुलगाव, सेलू, आर्वी, नाचनगाव, भद्रावती, चंद्रपूर, मुंबई आणि आदी ठिकाणाहून समाज बांधव सहभागी झाले होते. आज २१ रोजी सकाळी राजा कुमारपाल यांच्या १०८ दिव्यांच्या आरतीने आणि दरवाजे उघडून उत्सवाचा समारोप झाला. पाचही दिवस चाललेल्या या कार्यक्रमात वर्धेतील तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.