कश्मीरी विधि विद्यार्थ्यांचे रसुलाबादेत सर्वधर्मसमभावाचे धडे

ग्राम महिला बचत गटांची जाणली कार्यप्रणाली

    दिनांक :21-Feb-2026
Total Views |
वर्धा,
kashmiri law students कश्मीर म्हटले की, डोळ्यासमोर स्वर्गच उभा राहतो. आतंकवादामुळे कश्मिरी जनतेच्या मनातही भीतीचे वातावरण असते. कश्मीरमधील नवीन पिढीच्या मनातून भीती निघावी तसेच महाराष्ट्रातील नागरिक भीतीमुत वातावरणात कसे प्रगती करीत आहेत, याची माहिती देण्याच्या उद्देशाने आयोजित अभ्यास दौर्‍यादरम्यान कश्मिरी विधि विभागाच्या विद्यार्थ्यांनी रसुलाबाद येथे भेट देत सर्वधर्मसमभाव काय, हे जाणून घेतले.
 

kashmir  
 
 
आर्वी तालुयातील रसुलाबाद हे नवाबाचे गाव. येथे हिंदू-मुस्लिम व इतर जाती-धर्माचे नागरिक एकत्र राहतात. काश्मीरमधील लोकांना महाराष्ट्रामध्ये कसे वातावरण आहे, ते अभ्यासण्याच्या दृष्टीने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. अभ्यास दौर्‍यादरम्यान कश्मीर येथील विधि विभागाच्या विद्यार्थ्यांनी रसुलाबाद गावातील नागरिकांशी संवाद साधला. माजी सरपंच राजेश सावरकर यांनी रसुलाबाद गावात हिंदू-मुस्लिम ऐय असून सर्वधर्मसमभाव आहे. ग्रामपंचायतने आतापर्यंत स्मार्ट ग्राम, शाहू-फुले-आंबेडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता ग्राम पुरस्कार, घरकुल पुरस्कार, माझी शाळा-सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त केल्याची माहिती दिली. तर कश्मिरी विद्यार्थ्यांनी गावातील ग्राम महिला बचत गटाची कार्यप्रणाली, त्यांना मिळणार्‍या सोयीसुविधा, रोजगार, लघु उद्योग, डिजिटल सखी व गृह उद्योग चालवणारे बचतगटांची पाहणी करून माहिती जाणून घेतली.
कश्मिरी विद्यार्थ्यांनी जि. प. उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्राला भेट देत पाहणी केली. यावेळी विचार विकास संस्थेचे अधिकारी नितीन आकुलवार, सारिका चौरे, कल्पना चम्बुलवार, गजानन काळे, सविता आसोले, वैशाली ढोले, अर्चना आकडे, विना राऊत, पायल लोहबरे, गायत्री बांगडकर, फिरोज खान, शेख रफिक आदींची उपस्थिती होती.