जम्मू-काश्मीरमध्ये २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली

    दिनांक :21-Feb-2026
Total Views |
जम्मू,
officers transferred in Jammu जम्मू आणि काश्मीरमध्ये व्यापक प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी २२ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या निर्णयामुळे अनेक महत्त्वाच्या खात्यांमध्ये तसेच जिल्हा प्रशासनात नवे चेहरे दिसणार आहेत. राज्यकारभार अधिक कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने ही हालचाल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या फेरबदलात अश्वनी कुमार यांची वीज विकास विभागाच्या वित्तीय आयुक्त (अतिरिक्त मुख्य सचिव)पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे खाण विभागाच्या प्रशासकीय सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
 
 
officers transferred in Jammu
 
आशिष चंद्र वर्मा हे पर्यटन विभागाचे वित्तीय आयुक्त म्हणून कायम राहणार असून कृषी उत्पादन विभागाच्या प्रशासकीय सचिवपदाचाही कार्यभार ते सांभाळतील. शैलेंद्र कुमार यांच्याकडे वित्त विभागाच्या वित्तीय आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आर. एलिस वाझ यांची नियोजन, विकास व देखरेख विभागाच्या आयुक्त-सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून माहिती विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे देण्यात आला आहे. यश मुदगल यांना सहकार विभागाच्या आयुक्त-सचिवपदी जबाबदारी देण्यात आली आहे.
जिल्हास्तरावरही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. बडगामसाठी अतहर आमिर उल शफी खान, रियासीसाठी कुमार अभिषेक, अनंतनागसाठी डॉ. बिलाल मोहिउद्दीन भट, उधमपूरसाठी मिंगा शेर्पा, बारामुल्लासाठी सय्यद फखरुद्दीन हमीद, कुलगामसाठी शहजाद आलम आणि दोडासाठी श्रीकृष्ण लाल यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या नेमणुकांमुळे प्रशासन अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.