रिसोड,
Risod police operation, गेल्या दोन महिन्यांमध्ये रिसोड पोलिस स्टेशन अंतर्गत घडलेल्या ४ अपहरणाचे गुन्हे व ६ पुरुष महिलांचे मिसिंगचे गुन्हे दाखल झाले होते,त्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रिसोड पोलिस स्टेशन ने विशेष मोहीम राबवून सर्व अपहरण झालेल्या ४ व्यक्ती व मिसिंग झालेल्या ६ महिला पुरुष यांचा शोध घेऊन त्यांना त्यांचे नातेवाईकाचे ताब्यात सुखरूप दिले. या विशेष मोहिमेमुळे जनता समाधानी असून त्यांनी पोलिस स्टेशनच्या कामगिरीचे कौतुक केले.
११ जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी कमल आत्माराम धुमाळ रा. निजामपूर यांनी अल्पवयीन मुलगी अपहरणबाबत तक्रार दिली. त्यावरून रिसोड पोस्टे ला गुन्हा दाखल असून सदर मुलीचा शोध घेऊन पोलिस स्टेशन मुरगोडा जि. बेळगाव कर्नाटक राज्य येथून ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणून नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले. २५ डिसेंबर २०२५ रोजी भागुबाई पारवे रा. लोणी खुर्द यांनी अल्पवयीन मुलगी अपहरण बाबत तक्रार दिल्यावरून पोलिस स्टेशन रिसोड येथे गुन्हा दाखल असून, अल्पवयीन मुलीचे शोध घेऊन मुलीस हारदा जिल्हा खांडवा मध्य प्रदेश येथून ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन रिसोडला आणून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. १३ फेब्रुवारी २६ रोजी फिर्यादी जानुसिंग बळीराम राठोड रा. शिवाजीनगर रिसोड यांनी अल्पवयीन मुलगा अपहरण बाबत तक्रार दिल्यावरून पोलिस स्टेशन रिसोडला गुन्हा दाखल करून सदर मुलाचे शोध घेऊन मुलास सुलतानपूर जि. बुलढाणा येथून ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन रिसोड येथे आणून नातेवाईकांचे सुखरूप ताब्यात देण्यात आले. १६ फेब्रुवारी २०२६ रोजीत नसरीनबी शरीफ खा पठाण राहणार वडजी यांनी अल्पवयीन मुलगी अपहरण बाबत तक्रार दिली असता रिसोड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करून शोध घेऊन मुलगी नागरदास ता. मालेगाव जिल्हा वाशीम येथून ताब्यात घेऊन नातेवाईकाचे सुखरूप ताब्यात दिली.
त्याचप्रमाणे पोलिस स्टेशन परिसरातील मिसिंग झालेल्या ६ महिला व पुरुष यांचा शोध घेऊन त्यांना नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर सर्व गुन्ह्याचा तपास सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक व आधुनिक पद्धतीने करून कमी कालावधीमध्ये उघडकिस आणून विशेष कामगिरी केली आहे. सदर कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड, सहाय्यक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वात ऑपरेशन मुस्कान शोध पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवचरण डोंगरे, पोलिस उपनिरीक्षक संजय नंदकुले, वसंत तहकीक, पोलिस जमादार आशिष पाठक, महादेव चव्हाण, मंगेश पालवे, संतोष अवगळे, सुरेश येरमुले, पोकॉ अनिल राठोड, रुपेश मस्के, गणेश हाके, विनोद मस्के, कय्युम पठाण, अमोल हाके, माणिक जुंगाडे, सुनील निवाले यांनी केली आहे.