श्री गुरुमंदिर संस्थानला कार्डियाक रुग्णवाहिका स्नेहभेट

    दिनांक :21-Feb-2026
Total Views |
कारंजा लाड,
Shri Gurumandir Sansthan, देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल पाटणकर यांनी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान (श्री गुरुमंदिर संस्थान) यांना कार्डियाक रुग्णवाहिका स्नेहभेट म्हणून प्रदान केली. या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा २१ फेब्रुवारी रोजी गुरुमंदिर परिसरात उत्साहात पार पडला.
 

Shri Gurumandir Sansthan 
या कार्यक्रमास Shri Gurumandir Sansthan, संस्थानचे अध्यक्ष विनायक सोनटक्के, व्यवस्थापक प्रकाश घुडे, कोषाध्यक्ष अभय पारस्कर, डॉ. अजय कांत तसेच अमोल पाटणकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिकेच्या चावीचे संस्थेच्या विश्वस्तांकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर विधीवत पूजन करून रुग्णवाहिका जनसेवेसाठी समर्पित करण्यात आली. श्री गुरुमंदिर संस्थान हे धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्येही अग्रभागी राहिले आहे. यापूर्वी संस्थेकडे दोन रुग्णवाहिका कार्यरत असून, नव्याने दाखल झालेल्या कार्डियाक रुग्णवाहिकेमुळे हृदयरुग्णांना तातडीची आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संस्थेच्या समाजसेवेची व्याप्ती अधिक व्यापक झाली आहे. या कार्यक्रमाला लाभलेले मुख्य अतिथी अमोलजी पाटणकर यांच्या हस्ते डॉ. अजय कांत व राहुल महाजन यांचा सत्कार करण्यात आला बेरार एज्युकेशन सोसायटी यामध्ये डॉ. अजय कांत हे तिसर्‍यांदा निवडून आले आहे आणि राहुल महाजन हे सुद्धा यावेळेस कार्यकारणी मध्ये सदस्य म्हणून निवडून आले आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुशील देशपांडे यांनी केले. सोहळ्यास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.