खासदार काळे यांनी लिहिले रुग्णालयासाठी रताने पत्र, आंदोलन तीव्र

१५३७ सिंदीकरांचा सहभाग

    दिनांक :21-Feb-2026
Total Views |
सिंदी (रेल्वे),
Sindi Railway rural hospital demand, सिंदीत टाळ-मृदंगाचा गजर झाला, निवेदने दिली, आश्वासने ऐकविली पण सरकार हलले नाही. अखेर संतापलेल्या सिंदीकरांनी स्वतःच्या रताने पत्र लिहून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्याचा निर्धार केला आहे. आमच्या जिवाशी खेळ थांबवा, ग्रामीण रुग्णालय द्या, असा संदेश या रतपत्रांतून देण्यात आला आहे.
 

Sindi Railway rural hospital demand, blood letter protest Maharashtra, 1537 citizens blood signatures, Devendra Fadnavis letter protest, Amar Kale support, rural healthcare crisis Sindi, primary health center inadequate, Hinganghat taluka protest, NCP Sharad Pawar faction support, Atul Wandile, Raju Timande, Sudhir Kothari, Maharashtra rural hospital agitation, citizen health rights movement, Sindi municipal area healthcare issue, blood signature campaign India 
पालिकेचे शहर असूनही सिंदीत सक्षम आरोग्यसेवा नाही, ही वस्तुस्थिती संतापजनक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे; पण गंभीर रुग्णांना उपचारासाठी मैलोनमैल धाव घ्यावी लागते. अनेकवेळा उपचाराच्या विलंबामुळे रुग्णांनी प्राण गमावले, तरी शासनाच्या कानावर जणू कापूसच. आमदार, खासदार, मंत्र्यांना वारंवार निवेदने देऊनही ठोस निर्णय नाही. आश्वासनांचा पाऊस आणि प्रत्यक्षात कोरडी जमीन अशी अवस्था सिंदीकरांची झाली आहे.
 
 
जागे व्हा, असा इशारा Sindi Railway rural hospital demand, देण्यात आला. मात्र, सत्ताधार्‍यांनी दुर्लक्षच केले. अखेर शिवजयंतीच्या पर्वाचे औचित्य साधून रतातून शब्द उमटवण्याचा निर्णय झाला. गुरुवारी ५३७ जणांनी, तर शुक्रवारी ५०८ जणांनी आणि शनिवारी ४९२ जणांनी १० मिलिलिटर रत काढून पत्र लिहिले. तीन दिवसांत तब्बल १५३७ रताने पत्र लिहून शासनाला पाठवण्यात आली. तीन दिवसीय आंदोलनाच्या स्वयंस्फूर्त सहभागाने आंदोलनस्थळी चक मतदानासारख्या रांगा लागल्या होत्या. सुनीता नर्सिंग कॉलेज, केळझर येथील नर्सिंग शिकाऊ २० मुलींनी व त्यांच्या शिक्षिकांनी तीन दिवस सेवा देऊन आंदोलनाला मोलाचे योगदान दिले.
या आंदोलनात सर्वधर्म, सर्व समाज, सर्व पक्ष आणि सर्व वयोगटातील नागरिक एकदिलाने उत्तरले. महिला, विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू सर्वांनी हा आमचा जगण्याचा हक आहे, असे ठणकावून सांगितले. ही केवळ मागणी नाही, ही अस्तित्वाची लढाई आहे, असा सूर आंदोलनस्थळी उमटत होता.
 
 
खा. अमर काळे आणि राष्ट्रवादी शप गटाचे अतुल वांदिले यांनी स्वरताने पत्र लिहुन आंदोलनाला समर्थन दिले. सोबतच माजी आमदार राजू तिमांडे, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी आदी मान्यवरांनी भेटी देऊन समर्थन दिले.
शासनाने आताही आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर पुढील भिक मांगो आंदोलन करून शासनाला ग्रामीण रुग्णालय बनविण्यासाठी भिकेतील पैसे पाठविण्याचा सुतोवाच याप्रसंगी आंदोलन समितीने केला. या आंदोलनाला अमोल सोनटके मित्रपरिवार, जिल्हा राकाँ (श.प.)चे सरचिटणीस दशरथ ठाकरे, नप माजी उपाध्यक्ष सुधाकर खेडकर, नगरसेवक आशीष देवतळे, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, गटनेता अजय कलोडे, युवक शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर, सचिव धनराज झिलपे, बंटी बेलखोडे, युगल अवचट यांच्यासह येथील नागरिकांनी सहभागी होत आपला पाठिंबा दर्शविला आहे.