विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धेत वेदांत भोयर प्रथम

शिवजन्मोत्सव पर्वावर आधार फाउंडेशनचे आयोजन

    दिनांक :21-Feb-2026
Total Views |
हिंगणघाट, 
vedant bhoyar शिवजन्मोत्सवानिमित्त येथील आधार फाउंडेशनच्या वतीने विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धेचे दिमाखदार आयोजन नंदोरी रोड येथील साई मंदिर सभागृहात करण्यात आले होते. स्पर्धेत संपूर्ण विदर्भातील दर्जेदार वादविवादपटूंनी सहभाग नोंदवून शिवरायांच्या विचारांचा जागर केला. यात प्रथम क्रमांक वेदांत भोयर यांनी पटकावला.
 
 
vedant bhoyar
 
 
अध्यक्षस्थानी आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले, उद्घाटक पोलिस निरीक्षक अनिल राऊत, आधार फाउंडेशनच्या कार्यकारी अध्यक्ष माधुरी विहीरकर, सचिव सुनील डांगरे, प्रमुख अतिथी म्हणून मेनलाईन अकॅडमीचे संचालक चंद्रकांत नणंदकर, टार्गेट अकॅडमीचे संचालक सुशांत बाराहाते, यशोज्ञान स्पर्धा परीक्षाचे संचालक योगेश वानखेडे यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळसह विदर्भातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी व युवक, युवतींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
वादविवाद स्पर्धेत ‘नैतिक नेतृत्त्वाचा अभाव आजच्या समाजातील मोठी समस्या आहे किंवा नाही’ या विषयावर स्पर्धकांनी आपले परखड विचार मांडले. प्रथम क्रमांक वेदांत भोयर, द्वितीय मजीद बेग मुगल, तृतीय कल्याणी चांदेकर तर प्रोत्साहनपर बक्षीस साहिल फटिंग, श्रावणी अंबुलकर यांना देण्यात आले. विजेत्यांना रोख रकम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात आले. परीक्षक म्हणून नामवंत विचारवंत अ‍ॅड. इंब्राहिम बख्श व प्रा. अभय दांडेकर यांनी काम पाहिले.
 
वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार आजच्या तरुणाईपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे गरजेचे आहे, असे मत अतुल वांदिले यांनी व्यत केले. आधार फाउंडेशन सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सदैव अग्रेसर असते. शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित ही स्पर्धा विदर्भातील वतृत्त्व क्षेत्रातील एक मानाची स्पर्धा मानली जाते. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हकाचे व्यासपीठ मिळते, असे मत आधार फाउंडेशनच्या कार्यकारी अध्यक्ष माधुरी विहीरकर यांनी व्यत केले.
संचालन डॉ. गिरीधर काचोळे यांनी तर आभार सुहास घिनमीने यांनी मानले. यशस्वीतेसाठी माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत नगराळे, चंद्रकांत नणंदकर, प्रा. योगेश वानखेडे, सुशांत बाराहाते, पराग मुडे, प्रा. डॉ. शरद विहीरकर, लक्ष्मीकांत धार्मिक, मधुकर चाफले, माया चाफले, स्वाती वांदिले, ज्योती धार्मिक, विरश्री मुडे, अनिता गुंडे, सुमन डांगरे, जगदीश वांदिले, चंद्रशेखर निमट, आदींनी सहकार्य केले.