मुंबई
Bigg Boss Marathi 6 बिग बॉस मराठी पर्व ६ ने प्रेक्षकांना पुन्हा एकदा नवनवीन वळणावर घेऊन गेले आहे. शनिवारच्या भागात घरात “भाऊचा धक्का” पाहायला मिळणार असून, प्रोमो पाहून असं दिसतं की राखी सावंत पुन्हा एकदा प्रचंड उग्र आणि आग ओढणारी दिसत आहे.
कालच्या भागात राखी भावनिक होताना दिसली होती. बिग बॉसने तिच्यासाठी एक खास टास्क ठेवला होता, ज्यामध्ये तिने आपल्या आईच्या आठवणी आणि मनातील भावना प्रकट केल्या होत्या. या टास्कमध्ये राखी खूप भावुक झाली आणि तिने घरातील इतर सदस्यांनाही रडवले होते. मात्र, आजच्या प्रोमोमध्ये राखीचा रूप पूर्णपणे बदललेला दिसतो. तिने घरात उग्रपणे आपली भूमिका मांडली आहे.प्रोमोमध्ये दिसते की, भाऊ राखीला विचारतात की “तुम्ही खूप अनुभवी आहात, तर तुम्ही काय खेळलात?” त्यावर राखी रुचिताला प्रत्युत्तर देते की “मी काही तरी केले, तुम्ही फक्त लव्हलपाटा करत होतात.” या चर्चेदरम्यान रितेश मंच सोडताना दिसतो, पण रुचिता येऊन राखीशी वाद घालते आणि म्हणते, “ए हिरोईन… लव्हलपाटा काय? तुला काय करायचंय?” त्यावर राखी स्पष्ट करते की, “मला जे करायचंय ते मी करणार.” रुचिता तिला “लिमिटमध्ये राहा, पर्सनल गोष्टीत जाऊ नकोस” अशी इशारा देते.
हा प्रोमो प्रेक्षकांमध्ये Bigg Boss Marathi 6 फार चर्चेत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी रुचिताबाबत नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही कमेंट्समध्ये म्हटले आहे, “बरोबर आहे, रुचिताला बाहेर काढा, नाहीतर बिग बॉस बंद करा,” तर काहींनी लिहिले, “राखीचं काय चुकलं? मुलगी २२, मुलगा ४४!” असे मत मांडले. त्यामुळे प्रेक्षकांचा रुचिताबाबतचा प्रतिसाद फारसा सकारात्मक दिसत नाही.
बिग बॉस मराठी ६ मध्ये घरातील वाद, भावनिक टास्क आणि व्यक्तिमत्त्वाच्या संघर्षांनी प्रेक्षकांचा रस कायम राखला आहे. राखी सावंतच्या उग्र वागण्यामुळे घरात नवीन राडा आणि वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांचा मत आणि घरातील घडामोडी यावरून पुढील नॉमिनेशन्स आणि घरातील परिस्थिती कशी वळते, हे पाहणे आता मनोरंजक ठरणार आहे.