एपस्टाईनचे अब्जावधींचे साम्राज्य; मृत्यूपत्रात कोणाला मिळाली संपत्ती?

    दिनांक :22-Feb-2026
Total Views |
वॉशिंग्टन,  
epsteins-billion-dollar-empire अमेरिकेतील कुख्यात लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी जेफ्री एपस्टाईन याच्या मालमत्तेतून अनेक महिला पीडितांना मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई देण्यात आली आहे. अलीकडेच त्याच्या इस्टेटमधून डझनभर महिलांना एकूण ३५ दशलक्ष डॉलर वितरित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही पीडितांना १२१ दशलक्ष आणि ४९ दशलक्ष डॉलर इतकी रक्कम देण्यात आली होती. २०१९ मध्ये मृत्यूच्या वेळी एपस्टीनची एकूण संपत्ती सुमारे ६०० दशलक्ष डॉलर असल्याचे सांगितले जाते. मात्र एवढी अफाट संपत्ती त्याने नेमकी कशातून उभी केली, याबाबत आजही अनेक प्रश्न उपस्थित होतात.
 
epsteins-billion-dollar-empire
 
१९९० च्या दशकात मॅनहॅटनमध्ये साध्या घरात राहणारा एपस्टीन पुढील काही वर्षांत प्रभावशाली वर्तुळात झपाट्याने पोहोचला. विविध राजकीय नेते, उद्योगपती, राजघराण्यांतील सदस्य आणि अब्जाधीशांशी त्याने जवळीक वाढवली. या संपर्कांच्या जोरावर त्याने आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीतून मोठा प्रभाव निर्माण केल्याचा दावा केला जातो. epsteins-billion-dollar-empire अमेरिकेच्या न्याय विभागाच्या माहितीनुसार, एपस्टीनच्या इच्छापत्रात त्याच्या सहकारी घिसलेन मॅक्सवेलला हिला १० दशलक्ष डॉलर देण्याची तरतूद करण्यात आली होती. तसेच त्याचा भाऊ मार्क एपस्टीन आणि वैमानिक लॅरी विसोस्की यांनाही प्रत्येकी १० दशलक्ष डॉलर देण्याचे नमूद केले होते. त्याची दुसरी साथीदार कॅरीना शुलियाक हिच्या नावावर सुमारे ५० दशलक्ष डॉलरची मालमत्ता लिहून ठेवण्यात आली. पॅरिसमधील अपार्टमेंट, पाम बीच परिसरातील मालमत्ता, मॅनहॅटनमधील टाउनहाऊस, न्यू मेक्सिकोतील जोरो रँच आणि कॅरिबियनमधील लिटिल सेंट जेम्स बेटावरील मालमत्ता तिच्या नावे करण्यात आल्याचे सांगितले जाते. याशिवाय ३३ कॅरेटचा हिऱ्याची अंगठीही तिच्याकडे हस्तांतरित करण्यात आली होती.
न्याय विभागाच्या नोंदीनुसार, न्यूयॉर्क, पाम बीच आणि पॅरिस येथे त्याची आलिशान घरे होती. त्याच्याकडे कॅरिबियनमधील दोन खासगी बेटे, सुमारे ३८० दशलक्ष डॉलरची रोख रक्कम आणि विविध गुंतवणुकी होत्या. epsteins-billion-dollar-empire हेलिकॉप्टर आणि दोन खासगी जेट विमानांचाही त्याच्या मालमत्तेत समावेश होता. त्याच्या इस्टेटशी संबंधित अनेक व्यवहारांवर अद्याप न्यायालयीन वाद सुरू असून काही मालमत्ता विक्री प्रक्रियेत आहेत, तर काहींचा शोध आणि मूल्यांकन सुरू आहे.