*हिंगणघाटात हिंदू संमेलन
हिंगणघाट,
'Hindu Sammelan' हिंदू जीवनपद्धती ही सनातन संस्कृतीवर आधारित आहे. डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणेने शंभर वर्षांत समाजचैतन्य जागवण्याचे कार्य संघाने केले. जागतिक स्तरावर हिंदू समाज एकत्र येत आहे. पंचपरिवर्तन हेच जीवनाचे सार आहे, असे प्रतिपादन संस्कार भारती हिंगणघाट शाखेच्या मातृशती विधा प्रमुख वैशाली खेतल यांनी केले. येथील जुन्या वस्तीतील शीतला माता मंदिरात आयोजित हिंदू संमेलनात त्या प्रमुख वते म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर कपिले महाराज, आ. समीर कुणावार, रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह त्रिशूल लोंढेकर, नगरसेवक सोनू कुबडे, धनंजय बकाणे, देवा कुबडे आदी उपस्थित होते.
'Hindu Sammelan' वैशाली खेतल यांनी मनातील जळमट दूर करून मतभेद समाप्त करण्याचे आवाहन करीत हिंदू संस्कृतीत स्त्रियांना असलेल्या अधिकाराची जाणीव संस्कृत वचनातून करून दिली. यावेळी कपिले महाराज म्हणाले की, एकात्मतेचा मार्ग स्विकारून हिंदू जीवन, हिंदू परंपरा व सनातन संस्कृती जपण्याचे आवाहन केले. आ. समीर कुणावार यांनी हिंदू संस्कृती कशी जपली पाहिजे व युवा पिढीने त्याला कसे सामोरे जायचे यावर मार्गदर्शन केले. संचालन सनी बासनवार यांनी केले. प्रास्ताविक मोहन गंडाईत महाराज यांनी केले तर आभार गणेश धकाते यांनी मानले. यशस्वीतेसाठी दीपक चौधरी, गौरव तांबोळी, श्याम मेघरे, राजू माडेवार, नितीन माडेवार, इशांत खंदार, आशिष देहाडराय यांनी सहकार्य केले.