भारत–दक्षिण आफ्रिका लढतीत एका संघाला बसणार धक्का, विजयी मालिकेला ब्रेक लागणार

    दिनांक :22-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,  
india-south-africa-match आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ मधील सुपर-८ फेरीत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात महत्त्वाची लढत रंगणार आहे. दोन्ही संघांनी गट फेरीत आपले सर्व सामने जिंकत दमदार कामगिरी केली असून या टप्प्यावर एका चुकीची किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे हा सामना दोघांसाठीही अत्यंत निर्णायक मानला जात आहे.
 
india-south-africa-match
 
गेल्या काही वर्षांपासून दोन्ही संघ सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसत आहेत. india-south-africa-match २०२४ च्या विश्वचषकापासून भारताने सलग १२ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेनेही फक्त एक पराभव पत्करला असून उर्वरित सर्व सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे २०२४ च्या टी२० विश्वचषकात दोन्ही संघ अपराजित राहून अंतिम फेरीत पोहोचले होते. त्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर मात करत किताब जिंकला होता. त्यानंतरच्या स्पर्धांमध्येही दोन्ही संघांनी विजयी मालिकेची परंपरा कायम ठेवली आहे.
आजच्या सामन्यात मात्र एका संघाचा विजयी प्रवास खंडित होणार हे निश्चित आहे. भारताला पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेवर मात करून आपली लय कायम ठेवायची आहे, तर दक्षिण आफ्रिकेला दोन वर्षांपूर्वीच्या अंतिम सामन्यातील पराभवाची भरपाई करण्याची संधी आहे. india-south-africa-match त्यामुळे दोन्ही संघ आक्रमक रणनीतीसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. ही बहुप्रतिक्षित लढत अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर रंगणाऱ्या या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले असून दोन्ही बलाढ्य संघांमधील चुरशीची झुंज पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.