दक्षिण आफ्रिकेच्या ३ विकेट : जसप्रीत बुमराहची धडाकेबाज फलंदाजी

    दिनांक :22-Feb-2026
Total Views |
India vs South Africa T20 World Cup टी२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ फेरीतील भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची सुरुवात डळमळीत झाली आहे. अवघ्या चार षटकांत आफ्रिकेच्या टॉप-३ फलंदाजांना माघारी परतावे लागले असून भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक लय साधली आहे.
 

 India vs South Africa T20 World Cup 2026, Super 8 match 
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अचूक माऱ्याने आफ्रिकन फलंदाजांना कोंडीत पकडले. त्याने आपल्या दुसऱ्या बळीच्या रूपात रायन रिकेल्टनला बाद करत दक्षिण आफ्रिकेच्या डावाला मोठा धक्का दिला. रिकेल्टनला सात चेंडूत अवघ्या सात धावा करता आल्या. बुमराहच्या अचूक लाईन-लेंथसमोर तो निष्प्रभ ठरला.
याआधीही बुमराहने एक महत्त्वाचा फलंदाज माघारी धाडत आफ्रिकेला अडचणीत आणले होते. दुसरीकडे, अर्शदीप सिंगनेही आपल्या भेदक गोलंदाजीने एक विकेट घेत भारताला प्रभावी सुरुवात करून दिली.
चार षटकांच्या आतच तीन आघाडीचे फलंदाज बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेची धावगती मंदावली आहे. भारतीय गोलंदाजांनी टाकलेल्या शिस्तबद्ध आणि वेगवान चेंडूंमुळे आफ्रिकन फलंदाजांना मुक्तपणे फटकेबाजी करता आलेली नाही.
या सुरुवातीच्या धक्क्यांनंतर आता दक्षिण India vs South Africa T20 World Cup आफ्रिकेच्या मधल्या फळीवर डाव सावरण्याची जबाबदारी आली आहे. मात्र, भारतीय गोलंदाजांचा जोम पाहता आफ्रिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सुपर ८ फेरीतील या महत्त्वाच्या सामन्यात भारताने आक्रमक सुरुवात करत वर्चस्व प्रस्थापित करण्याचे संकेत दिले आहेत.