वरठीच्या तरुणीचा चेन्नईच्या समुद्रात बुडून मृत्यू

    दिनांक :22-Feb-2026
Total Views |
भंडारा,
Mayuri Chaudhary चेन्नई येथील एका आयटी कंपनीत अंतर्वासिता म्हणजेच इंटर्नशिप करण्यासा एका तरुणीचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. 21 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेने वरठी येथील चौधरी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर पसरला आहे कोसळला आहे. मयुरी चौधरी असे मृत तरुणीचे नाव आहे.
 

Mayuri Chaudhary Varathi Bhandara Maharashtra Chennai drowning incident 
कॉग्निझन्ट इंटर्नशिप करण्यासाठी महाराष्ट्रातील 15 तरुण-तरुणींचा समूह गेला होता. 21 फेब्रुवारी रोजी सुट्टी असल्याने सर्व मित्र चेन्नईच्या गोल्डन बीच वर गेले होते. समुद्रात गेल्यानंतर एकत्रितपणे सेल्फी काढत असताना अचानक आलेल्या दहा ते पंधरा फूट उंचीच्या लाटेत तिघेजण वाहून गेले. त्यातील एका तरुणाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र एका तरुणीचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला.भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील मयुरी चौधरी असे या तरुणीचे नाव आहे. तर तिसरा तरुण अजूनही बेपत्ता असल्याचे समजते.
मयुरी हिच्या मृत्यूच्या बातमीने चौधरी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 5 फेब्रुवारी रोजीच मयुरी चेन्नईला गेली होती असे कुटुंबीयांकडून सांगितले जाते. घटनेनंतर मयुरीचे कुटुंबीय चेन्नई साठी रवाना झाले आहेत. या घटनेनंतर भंडारा जिल्हा प्रशासन चेन्नई येथील प्रशासनाच्या संपर्कात असून मृतदेह ताब्यात घेण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्या जात असल्याचे समजते.