सेलू नपं विषय समित्यांवर दफ्तरी गटाची पकड

    दिनांक :22-Feb-2026
Total Views |
सेलू, 
Selu Nagar Panchayat नगरपंचायतच्या विविध विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. महिला व बालकल्याण समितीसह शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम समित्या जाहीर करण्यात आल्या. महत्त्वाच्या समित्यांवर दफ्तरी गटाचे वर्चस्व दिसुन आले.
 
 
nagar
 
Selu Nagar Panchayat  नगर पंचायतच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी रुखसार पठाण, उपसभापतिपदी उमा वांदिले यांची नियुती झाली. या निवडीसाठी नगरसेवक चंदा सावरकर यांनी नाव सुचवले तर कविता काटोले यांनी त्यास अनुमोदन दिले. शिक्षण, आरोग्य व स्वच्छता समिती सभापतिपदी रेखा खोडके तर सदस्यांमध्ये उमा वांदिले, राजेश जयस्वाल, गीता रामगडीया यांचा समावेश आहे. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती म्हणून गटनेते शैलेंद्र दप्तरी तर सदस्यांमध्ये उमा वांदिले, रामनारायण पाठक, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती किशोर इरपाते, सदस्य किशोर गुजर, अशरफअली सय्यद यांचा समावेश आहे. पीठासीन अधिकारी दीपक कारंडे यांनी या रचनेची माहिती सर्व सदस्यांना दिली. कारंडे यांना मुख्याधिकारी अनुप अग्रवाल सहकार्य केले. नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, नगरसेवक राजेंद्र मिश्रा यांनी सर्व नियुत सभापतींचे अभिनंदन केले.