"देवा, माझ्या सासूला घेऊन जा"; मंदिराच्या दानपेटीत पैशांसोबत अजब चिठ्ठी सापडली

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
बेळगाव, 
note-found-in-temple-donation-box कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातल्या खंडल गावात असलेल्या हुलिकंटेश्वर मंदिरात एक विलक्षण प्रकार समोर आला आहे. अलीकडेच येथे यात्रा पार पडली. यात्रेनंतर मंदिरातील दानपेटी उघडून दान मोजणी सुरू असताना कर्मचाऱ्यांना शंभर रुपयांच्या नोटेवर लिहिलेला एक संदेश आढळला आणि सगळेच अचंबित झाले.
 
note-found-in-temple-donation-box
 
त्या नोटेवर देवाला उद्देशून घरगुती दुःख दूर करण्याची विनंती करताना सासू पुढील यात्रेपूर्वी निधन पावो, अशी मागणी लिहिलेली होती. सहसा भक्त दानपेटीत कुटुंबातील सुख-शांती, आरोग्य, नोकरी, संतती किंवा आर्थिक भरभराट यांसाठी प्रार्थना लिहितात. मात्र एखाद्याच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करणारा संदेश आढळणे अत्यंत दुर्मिळ असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. हा संदेश नेमका कोणी लिहिला याची कोणतीही ओळख त्यावर नव्हती. note-found-in-temple-donation-box त्यामुळे तो सुनेने लिहिला की जावयाने, याबाबत काहीच स्पष्ट झालेले नाही. अनेक वर्षांच्या सेवेत अशी इच्छा कधीच पाहिली नसल्याचे कर्मचाऱ्यांनी नमूद केले.
घटनेची चर्चा आता गावभर रंगू लागली आहे. काही जण हे गंभीर कौटुंबिक तणावाचे प्रतीक मानत आहेत, तर काहींच्या मते हा रागातून किंवा विनोदाने लिहिलेला संदेश असू शकतो. note-found-in-temple-donation-box सामाजिक माध्यमांवरही या प्रकाराची मोठी चर्चा सुरू झाली आहे. मंदिर प्रशासनाने मात्र याकडे एक वेगळी आणि अनोखी प्रार्थना म्हणून पाहत कोणतीही चौकशी करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, प्रत्येक भक्त आपल्या भावना दानपेटीत अर्पण करतो आणि हीही त्याच भावनेची, थोडी वेगळी पण आश्चर्यचकित करणारी अभिव्यक्ती आहे.