असं गाव जिथे लग्नासाठी मुलींचा भरतो बाजार

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
स्तारा जागोर,  
market-for-girls-for-marriage जगातील काही ठिकाणी आजही अशा विचित्र प्रथा जिवंत आहेत ज्या प्रामुख्याने जाती किंवा समाजानुसार चालतात. अशाच प्रथांमध्ये एका विशिष्ट समाजातील स्त्रियांना लग्नासाठी खरेदी करण्याचा नियमही येतो. गरीब भागात हा प्रकार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. भारतात मध्य प्रदेशच्या शिवपुरीसारख्या ठिकाणीही अशी प्रथा दिसते, जिथे काही ठिकाणी लग्नासाठी महिलांचा बाजार भरतो.
 
market-for-girls-for-marriage
 
पण आज आपण ज्या ठिकाणी ही प्रथा पाहणार आहोत, ते भारत नाही; ते बल्गेरियामधील स्तारा जागोर गाव आहे. या गावात दर तीन वर्षांनी विवाह इच्छुक स्त्रियांचा बाजार भरतो. या ठिकाणी मुलींचे नातेवाईक तसेच संभाव्य वरांचे कुटुंबीय सहभागी होतात. या बाजारात तरुण लग्नासाठी पसंतीची मुलगी निवडतो आणि तिच्या कुटुंबाकडून खरेदी करून लग्न करतो. या प्रथेमागे मुख्य कारण म्हणजे या गावातील लोक आर्थिक दृष्ट्या खूप गरीब आहेत. market-for-girls-for-marriage मुलींच्या लग्नासाठी पैसे नसल्यामुळे अशा पद्धतीने हा मेळावा भरवला जातो. बाजारात विवाह इच्छुक तरुणीला नवरीच्या पोषाखात उभं केलं जातं आणि जर एखाद्या मुलीस पसंत केलं तर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने लग्न ठरवलं जातं. मुलाच्या कुटुंबाला बदल्यात जेवढी रक्कम ठरेल तेवढे पैसे मुलीच्या घरच्या लोकांना द्यावे लागतात.
ही प्रथा बल्गेरियामधील कलाइदझी समाजात आढळते.  या मेळाव्याचे नियम काटेकोर आहेत. दर तीन वर्षांनी हा मेळावा भरतो आणि त्यामध्ये फक्त कलाइदझी समाजातील मुलगा किंवा मुलगी सहभागी होऊ शकतो; बाहेरच्या कोणालाही यात सहभागी होण्याची मुभा नाही. या प्रथेबाबत अलीकडेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात हा मेळावा आणि त्यातील नियम स्पष्ट दिसून आले आहेत.