अजित पवार विमान अपघात : बारामतीत नागरिकांचा निषेध केली मोठी मागणी

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
बारामती
Ajit Pawar plane crash, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही. या दुर्दैवी घटनेची नेमकी कारणे काय आहेत, याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या पार्श्वभूमीवर, आज बारामतीत शेकडो नागरिक आणि कार्यकर्ते प्रशासकीय भवनासमोर एकत्र आले आणि अपघाताची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी केली.
 
 
 
Ajit Pawar plane crash,
स्थानिक प्रशासनासमोर Ajit Pawar plane crash,  नागरिकांनी आपल्या निषेधाची ताकद दाखवत लेखी निवेदन दिले. “अजितदादा हे केवळ आमचे नेते नव्हते, तर बारामतीचा आधार होते. त्यांच्या अपघाताची चौकशी तातडीने सुरू झाली पाहिजे आणि त्यातील सत्य जनतेसमोर आले पाहिजे,” असे आंदोलकांनी स्पष्ट केले.या आंदोलनामध्ये बारामतीतील सर्व प्रमुख सहकारी संस्था आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन उच्चस्तरीय चौकशीसाठी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले होते. नागरिकांच्या आंदोलना पार्श्वभूमीवर प्रांत अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळास भेट देऊन निवेदन स्वीकारले.विमान अपघाताच्या तपासातील उशीर आणि ब्लॅक बॉक्ससंबंधी माहितीबाबत येणाऱ्या तटस्थतेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे. लोकांचे म्हणणे आहे की जोपर्यंत या प्रकरणाचा सखोल आणि पारदर्शक तपास होत नाही, तोपर्यंत बारामतीकर शांत बसणार नाहीत.
काल लोणी भापकर येथे Ajit Pawar plane crash, ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून आपल्या निषेधाची ताकद दाखवली होती. या घटनांनी बारामतीत आणि राज्यभरात अजित पवार यांच्या अपघाताशी संबंधित प्रश्न अधिकच उभे केले आहेत. नागरिक आणि कार्यकर्ते या प्रकरणाच्या योग्य तपासणीसाठी सतत आवाज उठवत आहेत.सध्या प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षा वाढवली असून, चौकशीसाठी विविध तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, अपघाताची खरी कारणे आणि जबाबदार व्यक्ती ओळखणे हे राज्याच्या जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.